Tuesday, June 23, 2026
Homeचंद्रपूर"साहित्य माझे जीवन समूहाचे"ऑनलाईन स्पर्धा संपन्न…-दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त सलग दहा दिवस ऑनलाईन स्पर्धा…

“साहित्य माझे जीवन समूहाचे”ऑनलाईन स्पर्धा संपन्न…-दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त सलग दहा दिवस ऑनलाईन स्पर्धा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- “साहित्य माझे जीवन समूह महाराष्ट्र राज्य” या समूहाची स्थापना दि.३० जुलै २०२२ रोजी झाली होती.या समूहाला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दुसरा वर्धापनदिनानिमित्त सलग दहा दिवस वेगवेगळ्या प्रकारावर,वेगवेगळ्या विषयावर ऑनलाईन काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

स्पर्धेचे आयोजन समूहाचे संस्थापक अजय राऊत, संस्थापिका हर्षा भुरे भंडारा,संचालिका शुभांगी डांगरे यांनी केले.तर दहा स्पर्धेचे परीक्षण निलांबरी जाधव(केरळ),वैशाली राऊत(नागपूर),अजय राऊत(चंद्रपूर),शुभांगी डांगरे (नागपूर),पांडुरंग आलीम(रत्नागिरी),रुपाली निखारे(नागपूर),पद्माकर वाघरूळकर(छ. सं.नगर),धनश्री म्हेत्रस (पुणे), पुष्पलता येवलकर(नाशिक),हर्षा भुरे(भंडारा) यांनी केला होता.या स्पर्धेत महाराष्टातून ११२ साहित्यिक सहभागी होते.

या दहा स्पर्धेतून दहा गुण मिळवून हर्षा भुरे(भंडारा)यांनी पहिली बाजी मारली.तर रवींद्र गिमोनकर यांनी आठ स्पर्धेत क्रमांक मिळविले.पांडुरंग आलीम यांनी आठ गुण मिळविले.निलांबरी जाधव यांनी आठ गुण मिळविले तर शुभांगी डांगरे यांनी सात गुण मिळविले.डॉ.रेखा पौडवाल,वैशाली राऊत,  विनायक पाटील,जयद्रथ आखाडे,जमालोद्दीन शेख यांनीही सहा गुण मिळविले.हर्षा भुरे यांनी दहा पैकी दहा गुण मिळवल्याबद्दल समूहतर्फे यांना साहित्य सम्राज्ञी पुरस्कार देण्यात येणार आहे.तर ज्यांनी दहा पैकी आठ ते सहा गुण मिळविले त्यांना ‘काव्य रत्न पुरस्कार’ देण्यात येणार आहे.समूहातर्फे पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडर घ्यायचा की मुलांच्या शाळेची फी भरायची?

उद्रेक न्युज वृत्त :-सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी गॅस वापरणे बंद करून पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळण्यास सुरुवात केली आहे.सिलेंडर घ्यायचा की...

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-१७ जागांचा निकाल जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील १७ विधान परिषदेच्या जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला.अश्यातच आज,सोमवार २२ जून रोजी ११ स्थानिक स्वराज्य संस्था...

राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मोहिम.. – गडचिरोलीत वृक्ष लागवडयोग्य जमिनीची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी मोहिम हाती घेतली आहे.या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात व्यापक वृक्षारोपणासाठी उपलब्ध शासकीय जमिनींची प्रत्यक्ष...

देसाईगंज पोलिसांची धडक कारवाई; दारु तस्कराच्या आवळल्या मुसक्या.. – सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यातील दारु विक्रिवर प्रतिबंध लावण्यासाठी देसाईगंज पोलिसांनी धडक मोहिम हाती घेतली असुन एका दारु तस्कराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!