Saturday, June 27, 2026
Homeचंद्रपूरअन् ग्रामसेवकाने ग्रामसभेतच बदडले ग्रामपंचायत सदस्याला..

अन् ग्रामसेवकाने ग्रामसभेतच बदडले ग्रामपंचायत सदस्याला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चिमूर(चंद्रपूर) :-चिमूर तालुक्यातील खडसंगी जवळील गट ग्रामपंचायत शिवापूर (बंदर)/झरी (मांगरुड) येथे काल, शुक्रवारी दि.१४ जून रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत केसीसी कंपनीला कोणत्या आधारावर पाणी देत आहात; याबाबत ग्रामसेवक यांना तन्मय मेश्राम यांनी ग्रामसभेत जाब विचारले असता,ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रतिभा कन्नाके यांनी तन्मय मेश्राम तरुणास मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.त्यामुळे बराच वेळ ग्रामपंचायत कार्यालयात गदारोळ उडाला होता.

ग्रामसभेत ११५ ग्रामस्थांच्या सह्या मारून कोरम पूर्ण झाल्याने सरपंच यांच्या अध्यक्षेखाली ग्रामसभा सुरू झाली.ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गिट्टी खदान तलावातील साचून असलेल्या पाण्यावर विशेष ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्य तन्मय मेश्राम यांनी ग्रामपंचायत कमिटी व सचिवांना केसीसी कंपनीला गिट्टी खदान तलावातील साचलेले पाणी द्यायचे की नाही? अशी चर्चा रंगत होती.काही महिलांनी देण्यास सांगितले तर काहींनी पाणी देण्यास विरोध दर्शविला.मागील एक वर्ष केसीसी कंपनीला खदानमधील पाणी दिले त्याबाबत गावाला काय फायदा झाला.त्यांच्याकडून ग्रामपंचायतला किती महसूल मिळाला याबाबत हिशोब विचारणा करीत होते.तसेच याबाबत नोव्हेंबर २०२३ मधील झालेल्या मासिक सभेत केसीसी कंपनीला गिट्टी खदान मधील देत असलेले पाणी बंद करावे असा ठराव घेतलेला होता.या सर्व बाबीचा हिशेब,केसीसी कंपनीला कोणत्या आधारावर पाणी देत आहात व त्याबाबत असलेले पत्र ग्रामपंचायत सचिव यांना ग्रामसभासद तन्मय मेश्राम यांनी विचारणा केली असता.ही वादळी सभा होत असतानाही ग्रामपंचायत सचिव प्रतिभा कन्नाके यांनी तन्मय मेश्रामला मारहाण केली.याबाबत गट ग्रामपंचायतमधील झरी (मांगरुड) येथील युवक रोशन बावणे हा ग्रामसभेचे व्हिडीओ घेत असताना या झालेल्या मारहाणीचा सुद्धा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाल्याने ग्रामपंचायत सचिव यांना वाटले की मारहाणीचा व्हिडिओ काढत आहे.असे समजून त्यांनी रोशन बावणे या तरुणासुद्धा भर ग्रामसभेत मारहाण केली असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सदर घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असून ग्रामपंचायत सचिव कन्नाके यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे; अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!