Friday, October 16, 2026
Homeचंद्रपूर१३ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई…-आठवडाभरात अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई…

१३ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई…-आठवडाभरात अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलिस विभागाने सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे.या अनुषंगाने आठवडाभरात १३ अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई केली असून तडीपारचे आदेश संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत.अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यासंदर्भात पोलिस आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी आदेश पारीत करताच शुभम अमर समूद वय २६, रा.पंचशील वॉर्ड चंद्रपूर, शाहरुख नुरखा पठाण वय २९, रा.अष्टभुजा वॉर्ड, जयश्री लॉन जवळ चंद्रपूर, नैनेश उर्फ लाला नितीन शहा वय ३१, रा. लुंबिनी नगर, बाबुपेठ वॉर्ड चंद्रपूर, मोहन केशव कुचनकर वय २५, रा.चिचघर ले-आऊट वरोरा, दर्शन उर्फ बापू अशोक तेलंग वय २२, रा. मौलाना आझाद वॉर्ड बल्लारपूर,मुनीर खान वहिद खान पठाण वय ५५, रा.शिवनगर नागभीड,शिवशाम उर्फ भिस्सू दामोदर भुर्रे वय २५, रा.हनुमान नगर, ब्रह्मपुरी यांना कलम ५६ (१) (अ) (ब) मपोका अन्वये सहा महिन्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार केले आहे.तर आठवडाभरात आतापर्यंत एकूण १३ गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई केली असून यात वरील सात गुन्हेगार आणि अरविंद बापुजी उरकुडे वय ४५, रा.अमराई वॉर्ड घुग्घुस, प्रताप रमेश सिंग वय २६, रा.अमराई वॉर्ड घुग्घुस, श्यामबाबू चंद्रपाल यादव वय २९, रा. रयतवारी कॉलरी,चंद्रपूर,राजेश मुन्ना सरकार वय ४७, रा. इंडस्ट्रीय वॉर्ड, बंगाली कॅम्प चंद्रपूर,संतोष उर्फ विक्की भास्कर दुसाने वय ३०, रा.सिस्टर कॉलनी चंद्रपूर,अरबाज जावेद कुरेशी वय २६, रा.हवेली गॉर्डन चंद्रपूर यांना कलम ५६ (१) (अ) (ब) मपोका अन्वये ६ महिने व १ वर्षांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!