Thursday, April 16, 2026
Homeदेसाईगंजएक महिना लोटूनही चौकशीचा थांगपत्ताच लागेना....!- देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागातील भ्रष्टाचाराचे प्रकरण....-...

एक महिना लोटूनही चौकशीचा थांगपत्ताच लागेना….!- देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागातील भ्रष्टाचाराचे प्रकरण….- येत्या तीन दिवसांत वरिष्ठांकडे सत्यवान रामटेके  तक्रार करणार दाखल…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- ‘बोले तैसा चाले; त्याची वंदावी पाऊले’ अशा संतांच्या म्हणी प्रमाणे सत्यवान रामटेके यांनी प्रत्यक्षात कृती करून दाखवूनही समोरील अधिकारी व कर्मचारी यांना अजूनही चोलर शाहीच वाटत असल्याचा हल्ली प्रकार देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजनेच्या भ्रष्टाचार प्रकरणी निदर्शनास येऊ लागला आहे. 

सत्यवान रामटेके यांनी दिनांक-२० एप्रिल २०२३ रोजी देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजनेच्या संपूर्ण कामांवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यासंबंधाने विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली यांना तक्रार दाखल केली होती.तक्रारीत येत्या सात दिवसांत कुठल्याही प्रकारची चौकशी करून दोषींवर कारवाई न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.त्यानुसार कारवाई वा चौकशी न झाल्याने २ मे २०२३ रोजी रामटेके यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता.उपोषण सुरू असतांनाच त्याच दिवशी लिखित मागण्या मंजूर झाल्याने आमरण उपोषण मागे घेण्यात आला. लिखित मागण्यामध्ये ९ मे २०२३ रोजी सदर प्रकरणी चौकशी समिती गठीत करून रामटेके यांना सदर समितीचे सदस्य ठेवण्यात आले होते.चौकशी समिती गठीत तर करण्यात आली.मात्र ज्या विभागाची तक्रार करण्यात आली होती; त्याच विभागाचे सर्व समितीमध्ये ठेवण्यात आल्याने १७ मे २०२३ रोजी आक्षेप घेण्यात आला.

महत्वाचे म्हणजे गठीत करण्यात आलेली समिती; ही केवळ चार भिंतींमध्येच थाथुर-मातुर चौकशी करीत असल्याचा आरोप रामटेके यांनी केल्याने गठित समिती रद्द करण्यात आली.त्यानुसार देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली यांना त्याच दिवशी पत्रानिशी कळविण्यात आले होते. पत्रानिशी कळविण्यात येऊनही अजून पावेतो चौकशी समिती वा चौकशीचा थांगपत्ताच लागेनास झाला आहे.त्यामुळे येत्या तीन दिवसांत नव्याने चौकशी समिती गठीत न झाल्यास व कुठल्याही प्रकारच्या कारवाईचे संकेत न दिसल्यास ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजनेच्या व नव्याने करण्यात आलेल्या लागवड राज्य योजनेच्या संपूर्ण कामांवरील भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडून मुख्य प्रधान सचिव पुणे,अप्पर प्रधान सचिव पुणे व वनसंरक्षक नागपूर येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठांना पत्ररुपी तक्रार तीन दिवसांत करण्यात येणार असल्याचे सत्यवान रामटेके यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!