Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोलीगाळमुक्त तलाव,गाळयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी वरदान - भाग्यश्री आत्राम - येनकापल्ली येथे...

गाळमुक्त तलाव,गाळयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी वरदान – भाग्यश्री आत्राम – येनकापल्ली येथे गाळमुक्त तलाव,गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आलापल्ली (गडचिरोली) :- जिल्ह्यातील तलाव व जलसाठ्यात दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे तलावांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.तलावामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास तलावांची मूळ साठवण क्षमता पुन:स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे.त्यामुळे गाळमुक्त तलाव,गाळयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले आहे.

अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येनकापल्ली येथे मृद आणि जलसंधारण विभागाअंतर्गत झालेल्या गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार योजनेचा प्रारंभ करताना बोलत होते.यावेळी नागेपल्ली चे ग्रामपंचायत सदस्य मलरेड्डी येमनूरवार, लक्ष्मण येर्रावार,किरण खोब्रागडे,आनंद दहागावकर,पंकज नौनूरवार,पेसा अध्यक्ष किसन सिडाम,संजय मेडपल्लीवार,सतु मेडपल्लीवार,नरेंद्र मडावी,सुरेश आत्राम, संन्याशी मडावी,सदाशिव कुमराम,कलम शाही आत्राम,भगवान आलम, बिच्चू कुमराम,साईनाथ आत्राम,तुकाराम आत्राम,दिनेश कुमराम,गणेश वड्डे, सिद्धेश्वर मडावी,महेश आलाम, नागेश आत्राम,सागर आत्राम,मधुकर कुमराम,सुधाकर आत्राम आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना शासकीय यंत्रणा आणि अशासकीय संस्था यांचा योग्य समन्वय घडवून आणल्यास आणि गावातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्यास गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार योजना शंभर टक्के यशस्वी होऊ शकते असेही भाग्यश्री आत्राम यांनी म्हटले आहे.एवढेच नव्हेतर ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात गाळ टाकून पिकांची उत्पादकता वाढवायची आहे, त्यांनी संबंधित ग्रामपंचायतीकडे रीतसर अर्ज करून गाळ मागणीची नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!