Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूरनागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे तब्बल १० सराईत गुन्हेगार तडीपार..

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे तब्बल १० सराईत गुन्हेगार तडीपार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर येत  नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आणि सातत्याने गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असणाऱ्या  तब्बल १० सराईत गुन्हेगारांवर तडीपाराची कारवाई केली आहे.यात चंद्रपूर उपविभागांतर्गत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सहा सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ अन्वये तडीपाराची कारवाई करण्यात आली.यामध्ये प्रितम धनराज लभाने वय २८ वर्षे,रा.घुग्घूस,जि.चंद्रपूर याला तीन महिने,नंदकिशोर रामसागर सोनी वय ५० वर्षे, रा.रयतवारी कॉलरी,चंद्रपूर याला सहा महिने,शंकर नागलु तोकलवार वय ४७ वर्षे,रा.जलनगर वार्ड,चंद्रपूर याला तीन महिने,अन्सार अलीम खान पठाण वय २५ वर्षे, रा.इंदिरानगर,चंद्रपूर याला सहा महिने,दिनेश किशोर मडावी वय ४० वर्षे,रा.जलनगर वार्ड,चंद्रपूर याला सहा महिने आणि शिवम योगेश रागीट वय २२ वर्षे,रा.बाबूपेठ वार्ड,चंद्रपूर याला सहा महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.या सर्व आरोपींवर चोरी,घरफोडी,जबर दुखापत करणे,अवैध हत्यार बाळगणे,जुगार आणि अवैध दारू विक्रीसारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्या दहशतीमुळे नागरिक व साक्षीदार न्यायालयात किंवा पोलिसांसमोर उघडपणे साक्ष देण्यासही घाबरत होते. घुग्घुस,चंद्रपूर शहर व रामनगर पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावांवर चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी संजय पवार यांनी कायदेशीर पडताळणी करून हे तडीपारीचे आदेश दिले.सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले,ठाणे प्रभारी प्रकाश राऊत,पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके आणि पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या पथकाने पूर्ण केली.
तर ब्रम्हपुरी पोलिस ठाणेच्या हद्दीत अवैध दारू विक्री आणि सट्टापट्टीचा जुगार चालवून गावात दहशत निर्माण करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली.यामध्ये संजय मधुकर लांजेवार वय ५२ वर्षे,रा.फुलेनगर,ब्रम्हपुरी,सुरज नामदेव बगमारे वय ३७ वर्षे,रा.बोंडेगाव हुळकी,ब्रम्हपुरी,कमलसिंग मायासिंग जुनी वय २५ वर्षे,रा.मेंडकी,ता.ब्रम्हपुरी आणि वैभव उर्फ गोलू नानाजी राऊत वय ३० वर्षे,रा.गणेशपूर,ता.ब्रम्हपुरी यांचा समावेश आहे.विशेष म्हणजे,चौघांविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या.मात्र, त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती.यामुळे  सर्वसामान्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण होते.या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरी पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार करून ब्रम्हपुरीचे उपविभागीय अधिकारी तथा
दंडाधिकारी पर्वणी पाटील यांच्याकडे सादर केला होता. सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी या चारही गुन्हेगारांना एक वर्षासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश जारी केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!