Friday, September 25, 2026
Homeचंद्रपूररेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

रेल्वेची जोरदार धडक; बिबट्याचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या
मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली.मृत बिबट्या चार ते वर्षाचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.काल शनिवारच्या दुपारी एक बिबट मृतावस्थेत आढळून आला.रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्याने वनविभागास दिली.घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली.प्राथमिक अंदाजावरून,रेल्वेच्या जबर धडकेत बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व तीव्र आघातामुळे निर्माण झालेल्या न्यूरोलॉजिकल शॉकमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
शवविच्छेदनाची नियमानुसार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृत बिबट्याचे शव मध्यवर्ती रोपवाटिका,सुमठाणा येथे नेण्यात आले.वनअधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियमानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रेल्वेच्या धडकेत वन्य प्राण्यांचा जीव जात असल्याने  वन्यजीवप्रेमींकडून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि वनविभागाने संयुक्तपणे ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

पिसेवळधा ते भाकरोंडी रस्त्याची ‘ही’ अवस्था; विचार येतेय की कोणत्या ठिकाणी विकास होताय? -शहराचा विकास होत आहे,चांगली गोष्ट आहे; पण गाव खेड्याकडे पण लक्ष...

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातला विकास होत आहे; पण याच्याकडे लक्ष देणार तरी कोण? रस्त्याची अवस्था पाहून विचार येतेय की,कोणत्या ठिकाणी विकास होताय गडचिरोली जिल्ह्याचा.कोणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!