Monday, September 21, 2026
Homeभंडारापत्नीच्या डोळ्यादेखत वाघाचा हल्ला; पती ठार..

पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाचा हल्ला; पती ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातून एक धक्कादायक घटना आज,गुरुवार ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.दावेझरी गाव नजीकच्या चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाने  पतीला फरफटत नेत ठार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.बंसीलाल मेश्राम वय ५५ वर्षे,रा. दावेझरी,ता.तुमसर,जि.भंडारा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे.
आज गुरुवारच्या सकाळी नेहमीप्रमाणे बंसीलाल मेश्राम हे आपल्या पत्नीसोबत गायी,म्हशी चराईसाठी गावाजवळील चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गेले होते.गुरे चराई करत असतांना दोघेही पती-पत्नी काही अंतरावर उभे असतांनाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे बंसीलाल यांच्यावर झडप घातली. पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाने बंसीलाल यांना जबड्यात पकडून जंगल परिसरात फरफटत नेले.दरम्यान,पत्नीने जोरजोराने ओरडायला सुरुवात केली आणि कशीबशी धावत-पळत सुटून गावात येत सदर घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जंगल परिसरात शोधमोहीम राबवली असता बंसीलाल मेश्राम मृतावस्थेत आढळून आले. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!