- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नाल्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असतांनाच अखेर पुरात वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह सापडला.ही घटना गुरुवार ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती.बेपत्ता झालेल्या इसमाचे नाव श्रीराम मारुती भर्रे वय ६६ वर्षे, रा.मांदेड,ता.लाखांदूर,जि.भंडारा असे आहे.गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.अश्यातच श्रीराम भर्रे हे गुरुवारी सकाळी घरातून बाहेर पडले होते.त्यावेळी गावाजवळील नाल्याला मोठा पूर आला होता.नाला ओलांडण्याच्या प्रयत्नात त्यांचा पाय घसरून ते पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.विशेष म्हणजे, घटनास्थळाजवळ त्यांचा टॉवेल आढळून आल्याने ते नाल्यात बुडाल्याचा संशय अधिक बळावला होता. मात्र,त्यांचा शोध लागलेला नव्हता.दरम्यान,घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली.शोध मोहीम सुरू असतांनाच काल शुक्रवारी गावाजवळील नाल्यातील पाण्यात मृतदेह तरंगतांना आढळून आला.पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पाहणी केली असता श्रीराम भर्रे यांचाच असल्याची खात्री पटल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.पुढील तपास लाखांदूर पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

