Monday, September 7, 2026
Homeसिंदेवाहीउद्याला सिंदेवाहीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’चे आयोजन.. - महसुली तक्रारींचा...

उद्याला सिंदेवाहीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’चे आयोजन.. – महसुली तक्रारींचा तातडीने होणार निपटारा; नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या महसुली विषयक तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी उद्या,गुरुवार २३ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजता श्रवण लॉन,मूल रोड, सिंदेवाही येथे विशेष महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली सिंदेवाही तहसील कार्यालय यांच्या वतीने सदरचे शिबिर होणार आहे.
या शिबिरात ७/१२ व फेरफार नोंदी,रेशन कार्ड, उत्पन्न,जात,अधिवास व इतर प्रमाणपत्रे,जमीन अभिलेखाशी संबंधित बाबी तसेच इतर महसुली तक्रारी व अर्ज स्वीकारून त्यांचे तातडीने निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.तालुक्यातील नागरिकांनी आपल्या संबंधित महसुली समस्या व तक्रारींचे निराकरण करून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरास उपस्थित राहावे आणि शासनाच्या महसूल सेवांचा लाभ घ्यावा,असे आवाहन  सिंदेवाही महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!