Saturday, August 29, 2026
Homeचंद्रपूरकसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.....

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा उघडकीस आला आहे.पतीचे काही वर्षापूर्वी निधन झाल्याने ती चंद्रपुरात एका तरुणाच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबतच १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसह राहू लागली.या दरम्यान नराधम तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने मुलगी गरोदर राहिली.मुलगी गरोदर राहिल्याचे समजताच चंद्रपुरात वाच्यता होईल व आपली बदनामी होऊन भांडाफोड होऊ नये यासाठी प्रियकर आणि तिच्या आईने तिला प्रसूतीसाठी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले.तिथे मुलीचे वय विचारले असता, ‘ पुरामध्ये आमची सर्व कागदपत्रे वाहून गेली’ अशी खोटी माहिती देऊन मुलीचे वय २० वर्षे असल्याचे सांगितले.शंका बळावल्याने वैद्यकीय तपासणी दरम्यान डॉक्टरांनी नागपूरच्या अजनी पोलिसांकडे ‘एमएलसी’ पाठवली.अजनी पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवत हे प्रकरण चंद्रपूर पोलिसांकडे वर्ग केले आणि प्रकरणाचा मोठा भांडाफोड झाला. तपासाची सूत्रे चंद्रपूर शहराच्या रामनगर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी वाकडे यांच्याकडे येताच त्यांनी पीडित अल्पवयीन मुलीचे सविस्तर बयाण घेतले.यावेळी त्यांना हे प्रकरण केवळ अत्याचाराचे नसून,यामागे काहीतरी मोठे रॅकेट असल्याचा संशय आला.त्यांनी पीडित मुलीच्या आईला ताब्यात घेतल्यानंतर तिने यापूर्वी स्वतःचीच दोन मुले तेलंगणा आणि स्थानिक पातळीवर प्रत्येकी दोन लाख रुपयांना विकली होती,अशी धक्कादायक बाब समोर आली.अल्पवयीन मुलीच्या पोटी जन्माला आलेल्या नवजात बाळाचीही ती अशाच प्रकारे विक्री करणार होती.प्रकरणी पोलिसांनी मानवी तस्करीचे कलम जोडून बाळाची खरेदी करणाऱ्या एका महिलेला तेलंगणा राज्यातील कागजनगर येथून,तर दुसऱ्या महिलेला चंद्रपूर येथून बेड्या ठोकल्या. प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि नराधम प्रियकर अजय फुलझेले वय २६ वर्षे,रा.चंद्रपूर हा सध्या फरार असून पोलिस त्याच्या शोधावर आहेत. प्रकरणी चौघांवर काल शुक्रवारी मानवी तस्करी व पोक्सो अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!