- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील घोडपेठ गावातील कर्मवीर शाळेजवळ दोन दिवसांपूर्वी आढळून आलेल्या मृतदेह प्रकरणी धक्कादायक बाबी पोलीस तपासात समोर आल्याने सर्वजण अवाक् झाले आहेत. एका निर्दयी पत्नीने आपल्याच शिक्षक पतीच्या हत्येची सुपारी देत अपघाताचा बनाव रचला.मात्र,मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालावरून पत्नीने रचलेल्या नियोजित कटाचा भांडाफोड झाला.रविंद्र तुळशीराम कुळमेथे वय ४६ वर्षे,रा.मुधोली चक नं.२,ता.चामोर्शी,जि.गडचिरोली असे हत्या प्रकरणातील मृतकाचे नाव असून ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.हत्या प्रकरणी पत्नी दिपमाला रविंद्र कुळमेथे व वर्षा परचाके यांना चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथून,तर सोनू उर्फ प्रविण कालोकर व नाझीर अंसारी यांना नागपूर येथून अटक केली आहे.चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून एमएच ३१ डीसी ८९१९ क्रमांकाची कार आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक-५५०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (२),१४०(२),६१(२)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवार २ मे २०२६ रोजी सकाळच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथील कर्मवीर शाळेजवळ मृतदेह आढळून आला होता.प्रकरणी काही नागरिकांनी याबाबत भद्रावती पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पाठवला होता.दरम्यान,पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सदरचा मृतदेह रविंद्र तुळशीराम कुळमेथे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.अश्यातच रविंद्र यांची पत्नी ही माहेरी वरोरा येथे असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावले.इकडे मृतदेहाचा रुग्णालयातून आलेला अहवाल हा गळा आवळल्यामुळे निष्पन्न झाल्याने संशय बळावला. पोलिसांनी तिची सखोल चौकशी केली.तसेच तांत्रिक तपासात धक्कादायक बाबी उघड झाल्याने प्लान फसला.यातच भांडाफोड झाला.पतीच्या जाचापायी तिने नागपूर येथील वर्षा परचाके हिच्यासोबत संगनमत करून आणखी दोघांना हाताशी धरून पूर्वनियोजित एक लाख रुपयांची सुपारी दिली व सोनू उर्फ प्रविण कालोकर व नाझीर अंसारी यांनी रविंद्र यांना घोडपेठ परिसरातील निर्जनस्थळी नेऊन कारमध्येच गळा आवळून हत्या केली.त्यानंतर,मृतदेह घटनास्थळी टाकून आरोपी पळून गेले.प्रकरणी भद्रावती पोलिसांनी हत्येतील आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, पोलीस उपनिरीक्षक सवेश बेलसरे,संतोष निंभोरकर, भद्रवती पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विरेन्द्र केदारे,संजय मिश्रा,पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम,सहायक फौजदार महेन्द्र बेसरकर,पोलीस हवालदार अनुप आस्टूनकर,जगदीश झाडे,विश्वनाथ चुदरी,धर्मराज मुंडे,पोलीस अंमलदार योगेश घाटोळे,सतोष राठोड, प्रेमकुमार बावनकर,रोहित चिटगिरे,करिश्मा जुनघरी तसेच स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन कुरेकार,नितीन साळवे, प्रमोद कोटनाके,किशोर वैरागडे,पोलीस अंमलदार अमोल सावे,गोपीनाथ नरोटे,शेखर माधनकर,दिनेश अराडे,वृषभ बारसिंगे आदींनी केली.
- Advertisement -

