Friday, June 26, 2026
Homeभंडारामोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. - जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची घटना काल शुक्रवारच्या सायंकाळी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.साधना सीताराम उईके वय ५२ वर्षे,रा.धनेगाव, ता.तुमसर,जि.भंडारा असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
धनेगाव येथील साधना उईके ह्या नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास गावाशेजारील शेतशिवारात मोहफुले वेचण्यासाठी गेल्या होत्या.सकाळ होऊन दुपार झाली, तरीही त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांना चिंता वाटू लागली.दररोज लवकर येणाऱ्या साधना घरी परत आल्या नसल्याने कुटूंबीय तसेच ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली.अश्यातच गावाजवळील जंगलशिवारात साधना उईके यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह दिसून आला. लागलीच घटनेची माहिती वनविभागास तसेच पोलीस प्रशासनास मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील प्रत्यक्ष पाहणीत साधना उईके यांच्यावर नेमका कोणत्या प्राण्याने हल्ला केला,याबाबत सायंकाळपर्यंत संभ्रम निर्माण झाला होता.उपस्थित काहींनी वाघ तर,काहींकडून बिबट असल्याचा अंदाज लावला जात होता.मात्र,घटनास्थळावरील परिस्थिती लक्षात घेता सदरचा हल्ला बिबट्यानेच केला असल्याचा अंदाज तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी छगण रहांगडाले यांनी व्यक्त केला.विशेष म्हणजे,मृतक महिलेच्या मानेवर दोन दात गडून असल्याचे स्पष्टपणे दिसत होते.त्यानंतर, मृतदेह शवविच्छेदानासाठी रवाना करण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतरच वाघ की बिबट्या हे स्पष्ट होणार असून घटनेमुळे धनेगाव आणि परिसरातील शेतकरी व मजुरांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

विविध स्वयंरोजगार कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन.. – ५ लाखांपासून ते ५० लाखांपर्यंत मिळणार कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विमुक्त जाती,भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग तसेच वडार,रामोशी,लोहार,गवळी, विणकर आणि नाथपंथी समाजातील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक बळ मिळावे,रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात आणि...

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!