Wednesday, September 9, 2026
Homeचंद्रपूरअखेर नियमभंग केल्याप्रकरणी आमदारांकडून पाच हजाराचा दंड वसूल..

अखेर नियमभंग केल्याप्रकरणी आमदारांकडून पाच हजाराचा दंड वसूल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र
प्रकल्पात वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यटनाची शिस्त राखण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. विशेषतः जंगल सफारीदरम्यान मोबाईल फोन वापरणे अथवा जवळ बाळगण्यावर सक्त मनाई करण्यात आली आहे.नियमभंग केल्यास संबंधित पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे.दरम्यान,चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार करण देवतळे यांनी ताडोबा बफर क्षेत्रातील निमडेला पर्यटन गेटवरून ३० जानेवारी रोजी सपत्नीक जंगल सफारी केली होती.या सफारीदरम्यान त्यांनी मोबाईल फोनचा वापर केल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे,त्यांनी तयार केलेली एक रिल सोशल मीडियावर पोस्ट केली होती.त्या व्हिडिओमध्ये जिप्सीच्या आरशात मोबाईल फोन दिसून आल्याने सफारीदरम्यान मोबाईल वापरल्याचे स्पष्ट झाले होते.अश्यातच सदरचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ताडोबा प्रशासनाकडून कारवाई होणार का?याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वसामान्य पर्यटकांकडून नियमभंग झाल्यास ताडोबा प्रशासन तात्काळ दंडात्मक कारवाई करते.त्यामुळे आमदारांवरही समान नियम लागू होणार काय?असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला असतांनाच अखेर ताडोबा-अंधारी टायगर रिझर्व कंझर्वेशन फाउंडेशन,चंद्रपूर यांच्या वतीने या प्रकरणाची दखल घेऊन आमदार करण देवतळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.सफारीदरम्यान मोबाईल फोनचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्याकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!