Wednesday, September 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान..! गोरे दिसण्याच्या हव्यासापोटी वापरल्या जाणाऱ्या 'फेअरनेस क्रिम्स'चे धक्कादायक वास्तव समोर..

सावधान..! गोरे दिसण्याच्या हव्यासापोटी वापरल्या जाणाऱ्या ‘फेअरनेस क्रिम्स’चे धक्कादायक वास्तव समोर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-चेहऱ्यावरील डाग,त्वचेचा रंग उजळविणे,सुरकुत्या कमी करणे यासाठी अनेकजण त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला न घेता औषधांच्या किंवा सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानांतून स्वतःहून क्रीम खरेदी करतात.मात्र,अशा क्रीमपैकी बहुसंख्य उत्पादनांमध्ये ‘मरक्युरी’चे प्रमाण गरजेपेक्षा जास्त असल्याने आरोग्याचा गंभीर धोका वाढला आहे.गोरे दिसण्याच्या हव्यासापोटी वापरली जाणारी ‘फेअरनेस क्रिम्स’ आता थेट किडनीवर हल्ला करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.काहीजण सोशल मीडियावरील वा जाहिरातींना भुलून विविध प्रकारच्या क्रिम्स खरेदी करतांना दिसून येतात. मात्र,गोरे होण्याच्या क्रीममध्ये पाराचे(मरक्युरी) प्रमाण अधिक असल्यामुळे त्याचा सतत वापर करणाऱ्या नागपुरातील तब्बल २२ जणांना ‘मेंब्रनस नेफ्रोपॅथी’ हा गंभीर किडनी विकार जडल्याचे निदान झाले आहे. सदरचा आकडा केवळ एका तज्ज्ञाकडे नोंदवला गेला असून नागपूर शहरातील इतर सेंटरचा विचार करता हा आकडा शेकडोच्या घरात असल्याने चिंता वाढली आहे.
किडनी विकार तज्ज्ञ डॉ.मनीष बलवानी यांनी म्हटले की,गेल्या दोन वर्षात अशा क्रीमचा सातत्याने वापर करणाऱ्यांमध्ये ‘मेंब्रेनस नेफ्रोपॅथी’ या किडनी विकाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.या सर्वांनी फेसबुक व इतर सोशल मीडियावर पाहून स्वतःहून क्रीम विकत घेतल्याचे समोर आले आहे.फेअरनेस क्रीम्स’ केवळ तरुण-तरुणीच लावतात असे नाही. ‘मेंब्रेनस नेफ्रोपॅथी’ विकार असलेल्या २२ रुग्णांमध्ये सर्वात कमी वयाची रुग्ण २१ वर्षांची तरुणी असून,सर्वाधिक वयाचा रुग्ण ५७ वर्षीय पुरुष आहे. एकूण रुग्णांपैकी सुमारे ७० टक्के महिला,तर ३० टक्के पुरुष आहेत.यांचा क्रीम वापरण्याचा कालावधी हा सहा महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंतचा आहे.जेव्हा सतत क्रिम लावल्यास रक्तातील मरक्युरीचे प्रमाण वाढते,तेव्हा किडनीतील गाळणीच्या पडद्याला सूज येते.यामुळे शरीरातील आवश्यक प्रथिने लघवीवाटे बाहेर पडू लागतात.परिणामी चेहरा, डोळ्यांखाली आणि पायांवर सूज येते.यालाच ‘नेफ्रोटिक सिंड्रोम’ म्हणतात.किडनीची बायोप्सी केल्याशिवाय या आजाराचे नेमके निदान होत नाही.
  • डॉ.मनीष बलवानी,किडनीविकार तज्ज्ञ👇
सौंदर्य प्रसाधनांमध्ये पाऱ्याचा वापर वर्ण उजळविण्यासाठी केला जातो,मात्र त्याचे घातक परिणाम आता समोर येत आहेत. ‘नेफ्रोटिक सिंड्रोम’ आढळून आलेल्या रुग्णांची तपासणी केली असता त्यांच्यामध्ये मरक्युरीची पातळी वाढल्याचे निदान झाले.यामुळे किडनीला इजा झाली.या आजारावर औषधोपचार आहेत,परंतु दुर्लक्ष केल्यास किडनी निकामी होण्याची वेळ येऊ शकते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!