- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली येथे एका ५५ वर्षीय इसमाने वृद्ध महिलेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली.प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून नरेंद्र चुटे वय ५५ वर्षे, रा.विरली, ता.लाखांदूर,जि.भंडारा असे आरोपीचे नाव आहे.
पीडित वृद्ध महिला ही रात्रीचे जेवण करून घरात झोपलेली असतांना १ एप्रिलच्या रात्री पावणे दहाच्या सुमारास आरोपी नरेंद्र चुटे याने घराच्या मागील दारातून आतमध्ये प्रवेश केला.त्यानंतर,आरोपीने वृद्धेचे तोंड आणि गळा दाबून तिचा विनयभंग केला.पीडितेने आरडाओरड केल्यामुळे आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.घटनेनंतर पीडित वृद्धेने लाखांदूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.पोलिसांनी तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.प्रकरणाचा पुढील तपास लाखांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
- Advertisement -

