Friday, September 11, 2026
Homeभंडाराप्रकृतीत सुधारणा; बाळ विक्री प्रकरणातील डॉक्टरला बेड्या.. - आज न्यायालयापुढे करणार हजर..

प्रकृतीत सुधारणा; बाळ विक्री प्रकरणातील डॉक्टरला बेड्या.. – आज न्यायालयापुढे करणार हजर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-बाळ विक्री प्रकरणातील संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार तथा गोंदियाच्या ‘न्यू बालाजी हॉस्पिटल’ चा संचालक नितेश वाजपेयी याने अटकेच्या धास्तीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता.आरोपी डॉक्टर नीतेश वाजपेयी शनिवार १४ फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशच्या कटंगी येथून स्वतःच्या वाहनाने भंडाऱ्याच्या दिशेने निघाला होता.प्रवासादरम्यान त्याने स्वतःजवळ असलेल्या ब्लेडने शरीरावर आणि पोटावर गंभीर वार करून घेतले होते.रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या डॉक्टराला तातडीने तुमसर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडाऱ्यातील लक्ष हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू होते.अश्यातच त्याने मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. प्रकरणी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता.त्यामुळे पोलीस प्रशासन त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची वाट बघत असतांनाच रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तंदुरुस्त घोषित करताच पोलिसांनी काल गुरुवारच्या सायंकाळी ताब्यात घेतले आहे.अटक करण्यात आलेल्या डॉ.वाजपेयीला आज,शुक्रवार २० फेब्रुवारीला भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे.पोलीस कोठडी मिळताच प्रकरणास मोठे वळण येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.महत्वाचे म्हणजे,यापूर्वी आणखी काही बाळांची अश्याच प्रकारे विक्री केली की काय? याचाही उलगडा होऊ शकतो.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!