- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील माजी सैनिक ज्ञानेश्वर चौधरी यांच्या पत्नी ज्योती चौधरी यांचा वयाच्या ४३ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारच्या रात्री उशिरा घडली.शिवजयंतीचा उत्सव साजरा झाल्यानंतर सदरची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोंढाळा येथील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त गावातून महोत्सव रॅली काढण्यात आली.रॅलीत आबालवृद्ध,तरुण-तरुणी,पुरुष-महिला मंडळींनी सहभाग नोंदवून रात्री १० च्या सुमारास मुख्य चौकात प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यात ज्योती चौधरी यांनीही प्रसादाचा आस्वाद घेतला आणि घरी परतल्या.घरी परतल्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. प्रकृतीवस्थामुळे कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न करता ज्योती चौधरी यांना चारचाकी वाहनाने देसाईगंज येथील रुग्णालयात नेत असतांनाच रेल्वे क्रॉसिंग जवळ रात्री १२.३५ च्या सुमारास वाटेतच मृत्यू झाला.सहारे हॉस्पिटल येथे दाखल करताच तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.एका कर्तबगार,शांत,मन-मिळावू स्वभाव असलेल्या ज्योती चौधरी यांच्या अचानकपणे जाण्याची बातमी आज सकाळच्या सुमारास कानावर पडताच गावात स्मशान शांतता पसरली आणि आज,शुक्रवारी शोकाकुल वातावरणात दुपारी १ वाजेच्या सुमारास वैनगंगा नदी तीरावर अंत्यसंस्कार पार पडले.
- Advertisement -

