Saturday, May 23, 2026
Homeदेसाईगंजमेडिकलचा परवाना एकाचा अन् चालवतो दुसराच.. - प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री..

मेडिकलचा परवाना एकाचा अन् चालवतो दुसराच.. – प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-केवळ गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे,तर संपूर्ण राज्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणे सुरू झाले आहे.कुठे कालबाह्य औषधांची विक्री होतेय,तर कुठे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देऊन मेडिकलधारक मालामाल होऊ लागले आहेत. त्यातच,औषधांच्या मेडिकलचा परवाना एकाचा अन् चालवतो दुसराच,असे असतांनाही जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभाग अक्षम्य दुर्लक्ष करतांना दिसून येत असल्याने मेडिकलधारकांचे धंदे जोमात अन् सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य कोमात जाऊन धोक्यात आले आहे.
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय म्हणजेच चिठ्ठीशिवाय कोणतीही औषध व गोळ्यांची विक्री करता येत नाही. तसेच वितरीत केलेल्या औषधांची नियमित नोंद करणे आवश्यक आहे.संबंधितांना औषधांची बिलेही देणे बंधनकारक आहे.परंतु,काही मेडिकलचालक या नियमांना फाटे फोडू लागले आहेत.हल्ली कित्तेक ग्रामीण भागातील गावांमध्ये मेडिकलचालक स्वतःच गोळ्या, औषधांची विक्री करून नियमांना तिरांजली दाखवत आहेत.विशेष म्हणजे,कालबाह्य औषधांची विक्री, विनाप्रिस्क्रीप्शन औषधी देणे तसेच प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री केल्यास मेडिकल्सचे परवाने निलंबित करण्यात येतात.पण,करणार तरी कोण? केवळ तक्रार केल्यानंतरच कारवाई होणार काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोणती औषध केव्हा घ्यायची व कोणती गोळी केव्हा खायची,हे आता काही मेडिकलचालकच सांगू लागल्याने भविष्यात डॉक्टरांची गरजच पडणार नाही,अशी म्हणण्याची वेळ आली आहे.अश्यातच मेडिकल परवानाधारकास औषधांच्या बाबतीत माहिती असते.मात्र,परवाना एकाचा अन् चालवणारा दुसराच असला तर खोकल्याची गोळी तपासासाठी अन् तापाची गोळी खोकल्यासाठी,असे झाल्याशिवाय राहणार नाही. पैसे कमवणाऱ्यांपेक्षा एखाद्याचा जीव महत्वाचा की नाही?त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने आम्ही आहोत,किमान एवढे तरी लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!