Friday, October 23, 2026
Homeचंद्रपूर अबब...! चक्क दाताने करतोय कॉम्प्युटर कीबोर्ड टायपिंग - चंद्रपुरातील युवकाने दाताने टाईप करण्याचा...

 अबब…! चक्क दाताने करतोय कॉम्प्युटर कीबोर्ड टायपिंग – चंद्रपुरातील युवकाने दाताने टाईप करण्याचा केला विश्व विक्रम 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- आपण नेहमीच हाताने व पायाने टायपिंग करणारे बघत असतो.मात्र त्याहीपेक्षा चक्क दाताने कॉम्प्युटर कीबोर्ड टायपिंग करतांना कधी बघितले काय? तर नाही ना! असाच एक युवक चक्क दाताने वेगवान गतीने कॉम्प्युटर कीबोर्ड टायपिंग करून विश्व विक्रम केला आहे.

चंद्रपुरातील बाबूपेठ येथील हर्षल दिलीप नेवलकर यांनी चक्क दाताने टायपिंग करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.इंग्रजी वर्णमाला वीथ स्पेस सर्वात जलद गतीने टाइप करण्याच्या कौशल्याची वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेशन एजन्सी लंडन (डब्लूआरसीए) द्वारे दखल घेऊन विश्वविक्रमधारक म्हणून प्रमाणित केले आहे.

बाबूपेठ येथील हर्षल नेवलकर या युवकाने कॉम्प्युटर कीबोर्ड टायपिंग या शैक्षणिक क्षेत्रात डोळ्यांवर पट्टी बांधून (ब्लाइंड फोल्डेड) (१८० डिग्री रोटेट) कॉम्प्युटर कीबोर्डवर ए टू झेड अल्फाबेट विथ स्पेस फक्त सहा सेकंदांमध्ये पूर्ण केले होते.दुसरा विक्रम म्हणजे हाताचा वापर न करता दातांमध्ये पेन घेऊन ए टू झेड अल्फाबेट विथ स्पेस फक्त १४ सेकंदांमध्ये टाईप केले.या दोन्ही विक्रमांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये यापूर्वीच झाली होती.आता हर्षलला वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेशन एजन्सी लंडन (डब्ल्यूआरसीए) द्वारे दखल घेऊन विश्वविक्रमधारक प्रमाणित केले.हर्षल यांनी संपूर्ण इंग्रजी वर्णमाला विथ स्पेस सर्वात जलद गतीने टाईप करण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

भारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर...

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!