Thursday, August 27, 2026
Homeचंद्रपूरहजारोंच्या संख्येने तहसील कार्यालयावर आमदार बंटी भांगडिया समर्थनार्थ धडकला मुक मोर्चा- दाखल...

हजारोंच्या संख्येने तहसील कार्यालयावर आमदार बंटी भांगडिया समर्थनार्थ धडकला मुक मोर्चा- दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर (चिमूर) :- चिमूरशहरातील साईनाथ (अश्वमेघ) बुटके व त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याच्या आरोपावरून चिमूर विधानसभेचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्यावर विनयभंगासह दाखल केलेले विविध गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे, याकरिता आमदार भांगडिया समर्थकांनी बालाजी मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मूक मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना व पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

उपविभागीय पोलिस अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे,चिमूर विधानसभेचे आ. कीर्तीकुमार भांगडिया यांचे कुटुंबीयाबाबत चिमूर येथील साईनाथ (अश्वमेघ) बुटके यांनी,सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामीकारण पोस्ट व स्टेटस ठेवले होते.त्यामुळे कुटुंबीयांची समाजात बदनामी झाली.ही घटना त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर आमदारांनी साईनाथ( अश्वमेघ) बुटके यांना समजविण्याचा प्रयत्न केला.मात्र,आमदारांना बदनाम करण्याच्या द्वेषभावनेने बुटके यांच्या पत्नीने चिमूर पोलिस ठाण्यात खोटी तक्रार दाखल केली असा आरोप केला.हे सर्व प्रकार राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.त्यामुळे आमदर भांगडिया व कार्यकर्त्यांवर दाखल केलेले सर्व गुन्हे त्वरित हटविण्यात यावे.अशी मागणी भाजपा महिला आघाडी चिमूर तालुका, भाजयुमो चिमूर तालुका, भाजपा सर्व आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. मुकमोर्चा निमित्याने चिमू व्यापारी मंडळाने दुकाने बंद ठेवली होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रेनिंग संपली; आता महाराष्ट्राला मिळाले १२ नवे ‘आयपीएस’ अधिकारी.. – पहा कोणाला कुठे मिळाली पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-नुकतेच हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल १२ आयपीएस(भारतीय पोलीस सेवा) अधिकाऱ्यांना राज्यातील वेगवेगळ्या भागात जबाबदारी...

पैगंबरांच्या जिवनाचा आदर्श घ्या-इमाम फैजल अजहरी – कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ईद मिलादून्नबी(मोहम्मद पैगंबर जयंती)च्या पूर्वसंध्येला मौलाना आझाद चौक कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!