Saturday, May 23, 2026
Homeदेसाईगंजआमदार रामदास मसरामांची शेतकऱ्यांसह धान खरेदी केंद्रांवर धडक..!

आमदार रामदास मसरामांची शेतकऱ्यांसह धान खरेदी केंद्रांवर धडक..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे व आर्थिक स्थिती बळकट व्हावी,या उद्देशाने शासकिय हमीभाव धान खरेदी केंद्रे सुरु केली.मात्र,अद्याप गोदामे भरल्याची कारणे पुढे करून सहकारी संस्थांनी धान खरेदी बंद केल्याने जवळपास ५० टक्के शेतकरी धान विक्रिपासून वंचित राहणार असल्याची बाब आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या कानावर पडताच धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करण्यात यावी,यासाठी स्वतः पुढाकार घेत शेतकऱ्यांसह धान खरेदी संस्थेच्या कार्यालयावर धडक दिली.
देसाईगंज तालूक्यातील सहकारी खरेदी-विक्री संस्थेच्या माध्यमातुन ५ हजार २०७ शेतकरी बांधवांनी खरिप हंगामाचे धान विक्री करिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पुर्ण केली आहे.या पैकी आजच्या तारखेपर्यंत २ हजार ५२६ शेतकऱ्यांनी ९५ हजार ७२४ क्विंटल धान खरेदी केंद्रावर विक्री केला असून सुमारे २२ कोटी ६७ लाख ७० हजार १५६ रुपयांचे धानाचे चुकारे दोन महिने लोटूनही जमा करण्यात आलेले नाही.एवढेच नव्हे तर तब्बल २ हजार ७१९ शेतकरी अजूनही धान विक्री पासून वंचित असल्याने खुल्या बाजारात प्रति क्विंटल ४०० रुपयापेक्षा जास्त  दर तूटवडा असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होईल,सदरची बाब लक्षात येताच आमदार मसराम यांनी शेतकऱ्यांसह धान खरेदी
संस्थेचे कार्यालय गाठून संपुर्ण माहीती जाणून घेत पणन व्यवस्थापक किरण गाडे,गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,जिल्हा पणन व्यवस्थापक तिवाडे यांचेशी भ्रमनध्वनिवर चर्चा केली व जिल्ह्यातील तसेच विधानसभा क्षेत्रातील एकही शेतकरी धान विक्रिपासून वंचित राहू नये यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात व ज्या शेतकरी बांधवांनी आजच्या तारखे पर्यंत धान विक्री केली आहे; अश्या शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे तात्काळ बैंक खात्यात जमा करावे,जेणेकरुन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना धान लागवडीला अडचणींचा सामना करावा लागू नये.प्रकरणी जिल्हाधिकारी पंडा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत धान खरेदी केंद्रे पूर्ववत
सुरु करण्याची ग्वाही दिली.यावेळी धनपाल मिसार, नगरसेवक श्याम उईके,पुंडलिक घोडाम,दुर्वास नाईक, परशूराम ठाकरे,सुनिल मेश्राम,प्रमोद पिलारे,पुंडलिक तलमले,हिरामण गराटे,ज्ञानदेव पिलारे,सागर वाढई यांचेसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इंधन दरवाढीचा थेट परिणाम आता शेतीच्या कामांवर..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ झाल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी व मजुरांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची...

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!