Thursday, August 27, 2026
Homeआरमोरीट्रकची दुचाकीला धडक; एकाचा घटनास्थळीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी..

ट्रकची दुचाकीला धडक; एकाचा घटनास्थळीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-भाजीपाला घेऊन गावाकडे परतणाऱ्या दुचाकीस्वारांना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने समोरून धडक दिल्याने धडकेत एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी होऊन एकास किरकोळ दुखापत झाल्याची घटना काल सोमवारी सकाळच्या सुमारास आरमोरी तालुक्याच्या किटाळी बसस्थानक परिसरात घडली.अपघातात तुळशीदास रामाजी सहारे वय ४५ वर्षे, रा.देऊळगाव,ता.आरमोरी, जि.गडचिरोली यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर त्यांचा मुलगा विरेंद्र सहारे हा गंभीर जखमी झाला व देऊळगाव येथील ४८ वर्षीय दिलीप सोमाजी टेकाम हे किरकोळ जखमी झाले.
काल सोमवारी सकाळच्या सुमारास एमएच ३४ पी ८७८५ क्रमांकाच्या दुचाकीने तुळशीदास,त्यांचा मुलगा विरेंद्र व गावातील दिलीप टेकाम हे तिघेही भाजीपाला घेऊन देऊळगावकडे परत निघाले होते.दरम्यान,किटाळी गावानजीक येताच बसस्थानक परिसरात टीएस ०७ युके ३९९२ क्रमांकाच्या ट्रकने समोरून येत दुचाकीला जोरदार धडक दिली.यात दुचाकीस्वार तिघेही खाली पडले.तुळशीदास सहारे यांना जबर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर मुलगा विरेंद्र गंभीर जखमी झाला.अपघाताचे दृश्य पाहून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी धावून गेले.जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून ट्रक चालकासह ट्रक ताब्यात घेत ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१,१०६(१),१२५(अ),१२५(ब),३२४(४),१८४, १३४(अ)(ब)तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.ऐन प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच अपघातात जीव घेल्याने सहारे कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे पीएसआय विजय चलाख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!