Thursday, August 27, 2026
Homeचंद्रपूरसत्ता समीकरणाचा पेच कायम; वरिष्ठांच्या भेटी-गाठी वाढल्या..!

सत्ता समीकरणाचा पेच कायम; वरिष्ठांच्या भेटी-गाठी वाढल्या..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-राजकारणाची धुरा सांभाळणे मामुली गोष्ट नाही.निवडून येण्यासाठी जशी रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागते,त्याहीपेक्षा सत्ता स्थापनेसाठी जीवाचे रान करावे लागते.केवळ निवडून आले म्हणजे झाले असे नाही,तर ज्यांची आवश्यकता आहे,अश्यांना भाऊ बटा करून सोबती बनवल्याशिवाय पर्याय नाही आणि असाच प्रकार हल्ली चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकीय समीकरणात पहावयास मिळत आहे.या ठिकाणी अद्याप सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटेना.! असे झाले आहे.त्यामुळे वरिष्ठांच्या भेटी-गाठी वाढलेल्या दिसून येत आहेत. नुकतेच चंद्रपुरातील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आणि बहुजन वंचित बहुजन युतीच्या ८ नवनिर्वाचित नगरसेवकांसह २ अपक्षांनी मुंबईच्या मातोश्रीवर जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत उपस्थित होते.आपल्याला जो पक्ष सन्मानाने सहकार्य करेल,अशा पक्षासोबत सत्ता स्थापन करा आणि स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्या,असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला होता.अश्यातच आता आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.विशेष म्हणजे,चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला २३ जागांवर तर शिवसेच्या शिंदे गटाला १ जागेवर विजय मिळाला असून,महायुतीकडे सध्या एकूण २४ नगरसेवकांचे संख्याबळ आहे.तर काँग्रेस पक्षाकडे २८ नगरसेवक आहेत.मात्र,६६ सदस्यांच्या महानगरपालिकेत स्पष्ट बहुमतासाठी किमान ३४ नगरसेवकांची आवश्यकता असून,महायुती अद्याप बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे.तर उद्धव ठाकरे शिवसेनेचे ६ नगरसेवक,वंचित बहुजन आघाडीचे २ नगरसेवक असे या आघाडीचे ८ नगरसेवक निवडून आले आहेत.चंद्रपुर महानगरपालिकेत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने सत्ता समीकरणात शिवसेनेला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सत्तेच्या समीकरणात कोण बाजी मारणार? हे सांगताच येत नाही.कारण हे राजकारण आहे; यावर अधिक बोलणे उचित नाही.असेच म्हणावे लागेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!