Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्याचा होणार कायापालट; आज चारपदरी महामार्गास मंजुरी..

गडचिरोली जिल्ह्याचा होणार कायापालट; आज चारपदरी महामार्गास मंजुरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या आज,मंगळवार २७ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्याच्या दळणवळण व औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.समृद्धी महामार्गाच्या विस्ताराअंतर्गत नागपूर-गोंदिया सोबतच भंडारा-गडचिरोली महामार्गाच्या कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या विस्तारामुळे गडचिरोली जिल्ह्याचा राज्यातील प्रमुख आर्थिक केंद्रांशी थेट आणि जलद संपर्क अधिक बळकट होणार आहे.
याच बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी नवेगाव-मोरे-कोनसरी-मूलचेरा-हेडरी-सुरजागड या महामार्गाच्या सुधारित ८५.७६ किलोमीटर लांबीस व चारपदरी सिमेंट काँक्रिटकरणास मान्यता देण्यात आली आहे.हा महामार्ग खनिज वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून सुरक्षित,वेगवान आणि सुकर वाहतुकीस चालना मिळणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पायाभूत प्रकल्पांची कामे ठरावीक कालमर्यादेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.कोणताही प्रकल्प रेंगाळू नये,तसेच काम सुरू करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या व मंजुरी पूर्ण करूनच अंमलबजावणी करावी,असे त्यांनी सांगितले.
समृद्धी महामार्गाचा विस्तार आणि सुरजागड मार्गाच्या चारपदरीकरणामुळे गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक,रोजगारनिर्मिती,खनिज आधारित उद्योग तसेच एकूणच आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल,असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.यामुळे येत्या काळात गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!