Sunday, April 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्ततूर खरेदीस मान्यता; २० फेब्रुवारी पर्यंत नोंदणी सुरू.. - ८ हजार रुपये...

तूर खरेदीस मान्यता; २० फेब्रुवारी पर्यंत नोंदणी सुरू.. – ८ हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सन २०२५-२६ या हंगामासाठी महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.तुरीची खरेदी ८ हजार रुपये प्रति क्विंटल या किमान हमीभावाने केली जाणार आहे.या खरेदीसाठी २० जानेवारी २०२६ पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे.सदरची खरेदी प्रक्रिया नाफेड(NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF)या केंद्रीय संस्थांमार्फत राज्य सरकारच्या समन्वयाने राबविण्यात येणार असून त्यासाठी राज्यभरात ९३४ खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत.यावर्षी राज्यातील तूर उत्पादनाचा अंदाज १३.५१ लाख मेट्रिक टन इतका आहे.तसेच मागील हंगामात राज्यातील ८५ हजार शेतकऱ्यांकडून १३ लाख ३३ हजार १२८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली होती.
तूर खरेदी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये,यासाठी खरेदी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व जलद गतीने राबवावी,अशा स्पष्ट सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.आवश्यकता भासल्यास राज्यातील शंभर टक्के तूर खरेदीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल,असे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांची उच्चस्तरीय बैठक झाली.या बैठकीत सदरचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील लाखो तूर उत्पादक शेतकऱ्यांना याचा थेट लाभ होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!