Wednesday, August 26, 2026
Homeचंद्रपूर३८ वर्षीय एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या..

३८ वर्षीय एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका तरुण एसटी बस कर्मचाऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, शनिवार १७ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास चिमूर बसस्थानक परिसरात उघडकीस आली.सुधीर माणिक भिलकर वय ३८ वर्षे असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून भिलकर हे चिमूर बस आगारात कार्यरत होते.
आज शनिवारी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा वरून शालेय विद्यार्थ्यांनी भरलेली बस चिमूरकडे आली.सदरची बस ही बसस्थानक परिसरात येताच बसमधील काही विद्यार्थ्यांनी  खिडकीतून पाहिले असता एका झाडावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला.विद्यार्थ्यांनी घटनेची माहिती एसटी कर्मचाऱ्यांना दिली.कर्मचाऱ्यांनी तात्काळ चिमूर पोलिसांना पाचारण केले.ठाणेदार दिनेश लबडे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.घटनेने परिसरात शोककळा पसरली असून आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!