- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-जिल्ह्याच्या सालेकसा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या एका उपकृषी अधिकाऱ्याला शेतकऱ्यास पैश्याची मागणी करून पंगा घेणे महागात पडले आहे. अगोदरच शेतकरी बांधव सततच्या नापिकीमुळे आर्थिक विवंचनेत असतो.अश्यातच लाख रुपये पगार असलेल्या अधिकाऱ्यांना पगार कमी पडतो की काय? हक्काच्या पैश्यावरही यांची नजर असते,ही किती शरमेची बाब आहे.त्यामुळेच अश्यांना धडा शिकवणे गरजेचे झाले आहे.अश्याच प्रकारे रमेश मारोतराव टाकरस वय ५० वर्षे पद-उपकृषी अधिकारी,तालुका कृषी अधिकारी कार्यालय,सालेकसा ता.सालेकसा,जि.गोंदिया रा.रुम नं.६१२ बी.प्रसाद पॅलेस न्यु सुभेदार लेआउट,उदयनगर, नागपूर ता.जि.नागपूर,हल्ली मुक्काम संजय वलथरे यांचे घरी किरायाने बाजार चौक सालेकसा,ता.सालेकसा जि.गोंदिया यांनी लाच म्हणून ५ हजार रुपयांची मागणी करुन,स्विकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,प्रकरणातील
तक्रारदार यांचेकडे ५ एकर शेती असून,शेतीचे काम करण्यासाठी त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे.तालुका कृषी अधिकारी कार्यालय सालेकसा मार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना(PMKSY वैयक्तिक लाभार्थी योजना २.०)अंतर्गत शेतीचे कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचे रोटावेटरची केंद्र शासनाची योजना असून सदर योजने अंतर्गत रोटावेटरला शासनाचे ४०,०००/- रुपये अनुदान मिळणार असल्याने व त्यांना रोटावेटरची आवश्यकता असल्याने त्यांनी दिनांक-१७.०६.२०२५ रोजी शिव ॲग्रो गोंदिया येथून १,०५०००/-रुपये किंमतीचा रोटावेटर विकत घेतला.तक्रारदार यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथून सदर योजनेचा फॉर्म उपलब्ध करुन घेवून तो भरुन, त्यासाठी लागणारे कागदपत्र व रोटावेटर खरेदी केलेले जिएसटी बील त्यासोबत जोडून तक्रारदार यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय सालेकसा येथे सहा महिण्यापूर्वी दाखल करण्यासाठी गेले असता आरोपी रमेश टाकरस,उपकृषी अधिकारी सालेकसा यांनी तक्रारदार यांचा फॉर्म दाखल करुन घेवून रोटावेटरचे ४०,०००/-रुपयाचे अनुदान मिळण्यासाठी १०,०००/-रुपये दयावे लागतील,असे सांगीतले.तक्रारदार यांनी माझ्याकडे पैसे नसल्याबाबत सांगीतले असता,रमेश टाकरस यांनी बील मंजूर झाल्यावर १०,०००/- रुपये दयावे लागतील,असे तक्रारदार यांना म्हणाले.दिनांक- १२.१२.२०२५ रोजी रोटावेटरचे अनुदानाचे ४०,०००/- रुपये कधी येणार हे विचारण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे तक्रारदार गेले असता आरोपी लोकसेवक रमेश टाकरस यांनी रोटावेटरचे ४०,०००/- रुपये अनुदान आठ- दहा दिवसात मिळुन जाईल,असे सांगुन मंजुर झाल्यावर १०,०००/- रुपये आणून द्या,असे म्हणाले.दिनांक- १८.१२.२०२५ रोजी रोटावेटरचे ४०,०००/- रुपयाचे अनुदान तक्रारदार यांचे बँकेच्या खात्यात जमा झाल्यानंतर दोन तिन दिवसांनी रमेश टाकरस यांचे कार्यालयाबाहेर तक्रारदार यांची भेट झाली असता, त्यांनी ठरल्याप्रमाणे १०,०००/-रुपये आणुन द्या, असे म्हणाले.आरोपी यांनी दिनांक १२.०१.२०२६ रोजी १०,०००/- रुपये घेवून तक्रारदार यांना बोलावले असल्याने व तक्रारदार यांना ती लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी दिनांक- १२.०१.२०२६ रोजी सापळा अधिकारी,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया यांना फोन द्वारे कळविले होते.
सदर तक्रारीवरुन दिनांक-१२.०१.२०२६ रोजी सापळा अधिकारी यांनी दोन पंचासह सालेकसा येथे जावून तक्रारदार यांची तक्रार घेवून दिनांक-१२.०१.२०२६ व दिनांक-१६.०१.२०२६ रोजी आरोपी लोकसेवक यांची लाच मागणी पडताळणी कार्यवाही केली असता,आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना रोटावेटरचे अनुदान मंजूर करुन काढून दिल्याचे मोबदल्यात ५,०००/-रुपयाची लाचेची मागणी पंचासमक्ष करुन ती स्विकारण्याची तयारी दर्शविली.त्यानुसार,शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी लोकसेवक रमेश टाकरस,उपकृषी अधिकारी सालेकसा यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन तक्रारदार यांची रोटावेटरचे ४०,०००/-रुपयाचे अनुदान मंजूर करुन काढून दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्या कडून ५,०००/- रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारुन गैरफायदा घेतला.प्रकरणी आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन सालेकसा येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनीयम १९८८(संशोधन अधिनियम-२०१८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई डॉ.दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नागपुर,माधुरी बाविस्कर अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि.नागपुर,विजय माहुलकर अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि.नागपुर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उमाकांत उगले,पोलीस निरीक्षक अरविंद राऊत,स.फौ.चंद्रकांत करपे,पो.हवा.संजय बोहरे,पो.हवा मंगेश कहालकर,ना.पो.शि.संतोष शेंडे, अशोक कापसे,संतोष बोपचे,प्रशांत सोनवाने,कैलास काटकर चालक नापोशि दिपक बाटबर्वे यांचेसह गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक यांनी केली.
- नागरिकांना आवाहन👇
कुणाची लोकसेवकाविरुध्द तक्रार असल्यास त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,गोंदिया येथे खालील माध्यमाद्वारे संपर्क करावा.त्यांच्या तक्रारीची योग्य ती दखल घेण्यात येईल,असे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाचे पोलीस निरीक्षक उमाकांत उगले यांनी म्हटले आहे.
टोल फ्री क्रमांक – :-1064
कार्यालयीन क्रमांक:-07182/251203
व्हॉट्स ॲप नंबर :- 9664959090
ई-मेल :- acbgondia@gmail.com
- Advertisement -

