- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-एका अल्पवयीन मुलीचे वय लग्नाचे होण्याच्या आधीच तरुणाने बनावट आधार कार्ड तयार करून त्यात तीन वर्षांपूर्वीची जन्माची नोंद घेतली आणि एका मंदिरात लग्न केले.प्रकरणाचा भांडाफोड होताच तरुणाविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सदरचा प्रकार काल शनिवारी वरोरा तालुक्यात उघडकीस आला.अक्षय राजू मडावी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
कायद्यानुसार लग्नासाठी मुलीचे किमान वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.मात्र,काहीजण अती उताविळपणा करून ‘चट मंगणी पट ब्याह’ करू पाहतात.त्यातच,प्रेम प्रकरण सुरू असतांनाच
अनेक तरुण मुलीचे अठरा वर्ष कधी होतात,अशी आतुरतेने वाट बघत असतात.पण,सदरच्या प्रकरणात
मुलीचे वय कायद्याने लग्नासाठी कमी असल्याने अक्षयने अल्पवयीन प्रेयसीचे बनावट आधार कार्ड तयार करून मुलीचा जन्म २००८ सालचा असतांना, बनावट आधार कार्डमध्ये जन्म वर्ष २००५ दाखवून मुलीचे वय लग्नाचे झाल्याचे दाखविले.त्यानंतर,वणी-वरोरा बायपास मार्गालगत असलेल्या एका मंदिरात दोघांनी लग्न केले. प्रसंगी लग्नात अनेकजण उपस्थित असल्याची माहिती पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी वरोरा पोलिसात रात्री सव्वा दहा वाजता अक्षय मडावी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
- Advertisement -

