Thursday, August 27, 2026
Homeआरमोरीअज्ञात चोरट्यांचा सोने-चांदीच्या दुकानात डल्ला.. - आरमोरी शहरातील घटना..

अज्ञात चोरट्यांचा सोने-चांदीच्या दुकानात डल्ला.. – आरमोरी शहरातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी शहरात अज्ञात चोरट्यांनी जणूकाही धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे.अवघ्या दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर-२०२५ मध्ये एका अज्ञात चोरट्या महिलेने गर्दीचा फायदा घेत नवीन बसस्थानकावर दोन महिलांच्या पर्स मधून तब्बल ८ लाख ६४ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली होती.अश्यातच आज,शनिवार १७ जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी आरमोरी शहराच्या सुभाष चौक परिसरातील सोने-चांदीच्या दुकानात डल्ला मारून तब्बल ७० हजार ५०० रुपये किंमतीच्या चांदीच्या दागिन्यांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे,चोरट्यांनी एका ठिकाणची चोरी केल्यानंतर जवळच असलेले दुसरेही दुकान फोडण्याचा प्रयत्न केला,पण तो निष्फळ ठरला.
याबाबत अधिक माहिती अशी की,आरमोरी शहराच्या  सुभाष चौक या ठिकाणी ‘लक्ष्मीनारायण ज्वेलर्स’ नामक सोने-चांदीचे दुकान आहे.दुकानाच्या  संचालकांनी काल शुक्रवारच्या रात्री दुकान बंद केले होते.अश्यातच आज शनिवार सकाळच्या सुमारास दुकानाचे शटर उघडे दिसले.आतमध्ये पाहतात तो काय,अज्ञात चोरट्यांनी दुकानातील जुनी वापरती चांदीची मोड चोरी करून चांदीची चोरडी,लहान मुलांचे कडे,वाळे,कटली,असे एकूण ४७० ग्रॅम चांदीचे दागिने चोरी करण्यात आल्याचे उघड झाले.दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी जवळच असलेल्या हर्ष ज्वेलर्स दुकानाचेही शटर तोडण्याचा प्रयत्न केला,पण दुकानाला चॅनल गेट असल्याने चोरट्यांनी चोरीला पूर्णविराम दिला.प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध आरमोरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(४),३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नरेश सहारे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!