Saturday, July 11, 2026
Homeचंद्रपूरमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारींचा पाढा; ग्रामसेवक निलंबित..

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारींचा पाढा; ग्रामसेवक निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-कामात हयगय करणे,पदाचा गैरवापर करणे, वित्तीय अनियमितता करणे तसेच ग्रामपंचायत कार्यालयात झोपी जाणे आदी तक्रारींचा पाढा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेला आणि चौकशी अंती आरोप सिद्ध होताच चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी सावली तालुक्याच्या चकपिरंजी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दयानंद खोब्रागडे यांना निलंबित केले आहे.विशेष म्हणजे,प्रफुल्ल निरूडवार यांनी ग्रामसेवकाची तक्रार केली होती.निलंबन काळात खोब्रागडे यांना वरोरा पंचायत समिती मुख्यालय देण्यात आले आहे.
ग्रामसेवक दयानंद खोब्रागडे यांच्या बाबतीत तक्रारींचा पाऊस पडला होता.त्यांच्या विरोधात ग्रामस्थांनी तत्कालीन गट विकास अधिकारी व विद्यमान गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्याचबरोबर, वरिष्ठांच्या सूचनांचे पालन न करणे,चौकशी सुरू असतांना सहकार्य न करणे व चौकशी अहवालात अनेक त्रुटी आढळून आल्या.प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी खोब्रागडे यांचेवर निलंबनाची कारवाई केली आहे.कारवाईमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांना धडकी भरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!