Thursday, May 28, 2026
Homeभंडाराआंघोळीसाठी गेलेला एकजण वैनगंगा नदीत बुडाला..

आंघोळीसाठी गेलेला एकजण वैनगंगा नदीत बुडाला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-ऐन मकरसंक्रांती सणाच्या दिवशीच एका १६ वर्षीय मुलाचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात उघडकीस आली आहे.आज,बुधवार १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांती निमित्त तुमसर तालुक्याच्या तामसवाडी गावालगतच्या वैनगंगा नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या तीन मुलांपैकी एका मुलाचा बुडून मृत्यू झाला,तर दोघेजण थोडक्यात बचावले.सदरची घटना दुपारच्या सुमारास घडली.क्षितिज लीलाधर लांजेवार वय १६ वर्षे,रा.तामसवाडी,ता.तुमसर, जि.भंडारा असे मृताचे नाव असून तो डोंगरला येथील पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यालयाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी होता.तामसवाडी येथील क्षितीज लांजेवार, आर्यन श्रीराम ठाकरे आणि रुद्र पिंटू अमृते हे तिघे मित्र आज बुधवारी मकरसंक्रांतीनिमित्त गावालगतच्या वैनगंगा नदीपात्रात आंघोळीसाठी गेले होते.तिघेही नदीपात्रात उतरले.मात्र,पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही खोल पाण्यात गेले.तिघेही पाण्यात बुडत असतांनाच बाजूलाच उपस्थित असलेल्या तरुणाने आर्यन व रुद्र या दोघांना वाचवले.मात्र,क्षितिजला वाचविण्यात यश आले नाही.यात त्याचा मृत्यू झाला. लागलीच पोलिस आणि गावकऱ्यांच्या मदतीने क्षितिजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.ऐन सणाच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!