Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीजिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ४४५ कोटी ७८ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता..

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ४४५ कोटी ७८ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत सर्व यंत्रणांनी विहित कालमर्यादेत,योग्य पद्धतीने व शासन नियमांचे पालन करून निधी खर्च करावा,तसेच निधी खर्च करतांना गुणवत्ता,उपयुक्तता व लोकाभिमुखतेला प्राधान्य देण्याच्या सूचना आज,बुधवार १४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नियोजन भवन येथे कामांचा आढावा घेतांना दिल्या. यावेळी उर्वरित प्रशासकीय मान्यता,निधी वितरण तसेच सन २०२६-२७ साठीच्या प्रारूप आराखड्यांबाबत चर्चा करण्यात आली.ज्या कार्यालयांनी अद्याप प्रारूप आराखडे सादर केलेले नाहीत,त्यांनी ते तातडीने सादर करावेत,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विक्री केंद्रांची उभारणी,दूध प्रक्रिया उद्योगांना चालना देणे,सर्व शासकीय कार्यालये सौरऊर्जेवर(सोलर)आधारित करण्याबाबत प्रस्ताव सादर करणे,तसेच नाविन्यपूर्ण योजनांसाठी दर्जेदार व व्यवहार्य प्रस्ताव मांडण्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी भर दिला.प्रस्ताव सादर करतांना शासनाने ठरवून दिलेल्या उच्चतम खर्च मर्यादेच्या चौकटीतच ते राहतील,याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर ४५६ कोटी रुपयांच्या नियतव्ययापैकी आतापर्यंत ४४५ कोटी ७८ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.उर्वरित सुमारे ९ कोटी रुपयांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित असून,संबंधित यंत्रणांनी तातडीने तांत्रिक मान्यता सादर करून प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव पूर्ण स्वरूपात सादर करावेत,असे निर्देश पंडा यांनी दिले.या आढावा बैठकीस जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!