Saturday, September 5, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज शहरात आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन..

देसाईगंज शहरात आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आमदार रामदास मसराम यांच्या स्थानिक विकास निधीतून आज,शनिवार २७ डिसेंबर रोजी शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.देसाईगंज येथील हनुमान वार्डातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिर परिसरात गट्टू बांधकाम तसेच हनुमान वार्डात सिमेंट-काँक्रिट रोड बांधकाम या दोन कामांचा शुभारंभ आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते पार पडला.या कामांमुळे मंदिर परिसराचा कायापालट होणार असून नागरिकांना स्वच्छ,सुरक्षित व सुकर वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे. पावसाळ्यात परिसरात साचणारे पाणी व चिखलाची समस्या दूर होऊन भाविकांसह स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.हनुमान वार्डातील सिमेंट -काँक्रिट रोड बांधकामामुळे दळणवळण अधिक गतिमान होणार असून परिसरातील स्थानिक नागरिकांना दैनंदिन वापरासाठी सोयीचा रस्ता उपलब्ध होणार आहे.
भूमिपूजन प्रसंगी आमदार रामदास मसराम यांनी सांगितले की, “देसाईगंज शहरातील प्रत्येक प्रभागाचा समतोल व दर्जेदार विकास करण्याचा ध्यास असून नागरिकांच्या गरजा लक्षात घेता स्थानिक विकास निधीतून आवश्यक ती सर्व विकास कामे मंजूर करण्यात येत आहेत.भविष्यात देसाईगंजच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.”
कामांचे भूमिपूजन करतेवेळी माजी नगराध्यक्ष शालूताई दंडवते,देसाईगंज नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक विकास प्रधान,नगरसेवक श्याम उईके,नगरसेविका राधिका पत्रे,नगरसेविका गुरमीतकौर चावला,नगरसेविका आश्या दहिवले,नगरसेविका फैमिदा पठाण,नगरसेविका मंदा समर्थ,कांग्रेस नेत्या वनिता नाकतोडे तसेच सर्व तुकडोजी महाराज मंदिराचे अधक्ष,उपाध्यक्ष,सचिव, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!