Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली पोलीस दलात ३४ नव्या वाहनांचा ताफा दाखल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण..

गडचिरोली पोलीस दलात ३४ नव्या वाहनांचा ताफा दाखल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम,गतिमान व प्रभावी करण्याच्या दृष्टीने गडचिरोली पोलीस विभागाला ३० स्कॉर्पिओ वाहने,२ बस व २ मोटारसायकली असा एकूण ३४ वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला आहे.या नव्या वाहनांचे वितरण आज,शनिवार २७ डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.
कार्यक्रमास वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन, विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल,गृह(ग्रामीण), गृहनिर्माण,शालेय शिक्षण,सहकार,खनिकर्म राज्यमंत्री डाॅ.पंकज भोयर,आमदार डॉ.मिलिंद नरोटे,नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकीत गोयल,जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते.
मिळालेल्या नव्या वाहनांमुळे दुर्गम व आदिवासी भागात जलद गस्त,आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद, नक्षलविरोधी मोहिमा तसेच दैनंदिन पोलीस कामकाज अधिक कार्यक्षमतेने पार पाडणे शक्य होणार आहे. स्कॉर्पिओ वाहने गस्त व ऑपरेशनल कामांसाठी उपयुक्त ठरणार असून बस वाहनांचा उपयोग पोलीस पथकांच्या वाहतुकीसाठी तसेच विशेष मोहिमांसाठी होणार आहे. मोटारसायकलींमुळे अरुंद व दुर्गम मार्गांवरही पोलीस उपस्थिती वाढण्यास मदत मिळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!