Tuesday, September 1, 2026
Homeनागपूरशालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपींचा पक्का चिठ्ठा तयार..

शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपींचा पक्का चिठ्ठा तयार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्याचा कच्चा नाही,तर पक्का चिठ्ठा तयार झाला असून घोटाळ्यातील सर्व फाईली तपासण्यात आल्याने  याबाबत येत्या,शुक्रवार २ जानेवारी २०२६ रोजी अंतिम अहवाल सादर होणार आहे.शालार्थ आयडी प्रकरणांत एकूण २६ आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत.यात ४ विभागीय शिक्षण उपसंचालक, ४ शिक्षणाधिकारी,४ लिपिक,३ शाळा मुख्याध्यापक,२ शाळा संचालक,८ सहाय्यक शिक्षक तसेच १ वेतन अधीक्षक असे एकूण २६ आरोपी अटक करण्यात आलेले आहेत.यातील बहुतांश जामिनावर बाहेर आहेत. घोटाळ्यात एकूण ६७३ शिक्षकांचे वेतन निघाले.मृतक शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या सहीनेही बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आले.मात्र,त्याची संपूर्ण फाइलच शिक्षण विभागातून गहाळ झाली आहे.नागपूर विभागात घोटाळ्यात प्रमुख १३ आरोपींनी तब्बल १ हजार ९७२ बनावट आयडी तयार करून तब्बल १५० कोटींची फसवणूक केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.यात चिंतामन वंजारी यांनी-२५३ आयडी,रवींद्र काटोलकर -३९ आयडी,रोहिणी कुंभार-२४४,सिद्धेश्वर काळुसे-१५४,अनिल पारधी-८१,वैशाली जामदार-२११, सतीश मेंढे-८३,उल्हास नरड- १८७,गौतम गेडाम -४०, नीलेश वाघमारे-६८० इत्यादी शालार्थ आयडी तयार करण्यात आल्या आहेत.सर्व फाईली तपासण्यात आल्याने आता अंतिम अहवाल तयार झाला आहे.त्यावर संबंधित वरिष्ठांच्या सह्या झाल्यानंतर येत्या २ जानेवारी २०२६ रोजी अहवाल सादर केला जाईल,असे शालार्थ आयडी घोटाळ्याची प्रशासकीय चौकशी करीत असलेले प्राथमिक व माध्यमिक विभाग संचालक महेश पालकर यांनी स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!