Sunday, July 19, 2026
Homeभंडारामतदान यंत्र तयार करतांनाचा निष्काळजीपणा भोवला; तब्बल सात कर्मचारी निलंबित..

मतदान यंत्र तयार करतांनाचा निष्काळजीपणा भोवला; तब्बल सात कर्मचारी निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-भंडारा शहराच्या नगर परिषदेची मतमोजणी सुरू असतांना मतदान यंत्रावरील उमेदवाराचे नावच गायब झाल्याने एकच खळबळ माजली होती.प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या करुणा ऋषी राऊत यांनी आक्षेप घेतल्याने मतमोजणी पुढे ढकलून रात्री उशिरा निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन आल्यावर १० वाजताच्या सुमारास निकाल जाहीर करण्यात आला होता.अश्यातच मतदान यंत्रे तयार करणारे व त्याचे साहित्य मतदान केंद्रावर पोहचविणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या.त्यानुसार,कर्तव्यात कसूर तसेच निष्काळजीपणाचा ठपका ठेवत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी संबंधित केंद्रातील सर्व सात अधिकारी,कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.यामध्ये भंडारा नगर परिषदेचे लिपिक पियुष शक्करवार,जे.एम.पटेल महाविद्यालयाचे शिक्षक(केंद्राध्यक्ष)के.एच.लांजेवार, विकास माध्यमिक शाळा खरबी नाकाचे शिक्षक(मतदान अधिकारी क्र.१)जी.एस.नागदेवे,प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी (मतदान अधिकारी क्र.२)महेश दुर्गाडे आणि नूतन कन्या शाळेच्या शिक्षिका(मतदान अधिकारी क्र.३)लीनादेवी चिचमलकर,टेकेपार उपसा सिंचन उपविभाग आंबाडीचे उपविभागीय अधिकारी मोहम्मद इसरार,चांदोरीचे तलाठी ए.एन.मळघने अशी निलंबित केलेल्या अधिकारी,कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
भंडारा नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी रविवार २१ डिसेंबर रोजी पोलिस बहुउद्देशीय सभागृहात पार पडली.सुरवातीच्या दोन प्रभागांची मतमोजणी सुरळीत झाली.त्यानंतर तिसऱ्या प्रभागाची मतमोजणी सुरू होताच प्रभाग ३ ‘अ’ मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार करुणा राऊत यांचे नावच ईव्हीएममध्ये नसल्याचे दिसून आले.यामुळे गोंधळ उडाला.संपूर्ण १७ प्रभागांची मतमोजणी संपल्यानंतर प्रभाग ३ ‘अ’ची मतमोजणी करण्यात आली.प्रभाग क्र.३ ‘अ’ मध्ये एकूण ५ उमेदवार व १ नोटा असे ६ पर्याय असणे आवश्यक असतांना मतदान यंत्र तयार करतांना उमेदवार क्र.५ आणि ६ (नोटा)ची नावे झाकली गेली होती.त्यामुळे प्रत्यक्ष मतदान केवळ ४ उमेदवारांसाठीच उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे संबंधित केंद्रावरील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला आहे.तथापि,मतमोजणी दरम्यान ही गंभीर तांत्रिक चूक निदर्शनास आल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी संबंधित केंद्रातील सर्व सात अधिकारी,कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध गावात दहशत माजवणारी वाघीण जेरबंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील विविध गावात दहशत माजवणाऱ्या वाघिणीला पकडण्यात वनविभागास यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.विशेष म्हणजे,वाघिणीने समुद्रपूर तालुक्याच्या पिंपळगाव,उंदीरगाव,साखरा,...

अखेर उद्या होणारा डॉक्टरांचा राज्यव्यापी संप मागे; आरोग्य सेवा राहणार सुरळीत..

उद्रेक न्युज वृत्त :-ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन(IMA) महाराष्ट्र राज्य शाखेने राज्यव्यापी बंदची घोषणा...

गडचिरोली जिल्ह्यातील विविध विषयांवर आमदार मसरामांची मुख्य वनसंरक्षकांशी चर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी नुकतीच गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांची  सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील वने,वन्यजीव व शेतकऱ्यांशी संबंधित विविध...

जोरदार पावसाचा नवा अंदाज; पुढील पाच दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा सुधारित अंदाज वर्तविला होता.त्यानुसार,१५ जुलैपासून महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली.विशेषतः १६ जुलैपासून विदर्भात पावसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!