Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीचक्क मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशाला केराची टोपली.. - कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची पाठराखण..

चक्क मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशाला केराची टोपली.. – कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची पाठराखण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अवैध सागवान वृक्षतोड प्रकरणी पुराव्यानिशी तक्रार दाखल करून महिना संपत आला. पण,झोपेचे सोंग घेणाऱ्या मुर्दाळ प्रशासनास जागच येईनासे झाले आहे.आंदोलनाचा पवित्राही घेण्यात आला. पण,परवानगी नाकारण्यात आल्याने तेही राहून गेले. अश्यातच आंदोलनाचा धसका घेत वरिष्ठांनी आदेश दिले खरी,पण त्या आदेशाला केराची टोपली दाखवून कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची पाठराखण केला जात असल्याचा प्रकार गडचिरोली वनवृत्ताच्या वडसा वन विभागात उघडकीस आला आहे.
याबाबत प्रकरण असे की,गडचिरोली वनवृत्ताच्या वडसा वन विभागांतर्गत येणाऱ्या पुराडा वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील रामगड उपक्षेत्राच्या रामगड नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक-२४१ मध्ये मुख्य मार्गाला लागूनच तब्बल ९ सागवान वृक्षांची अवैधरीत्या वृक्षतोड करण्यात आली.याबाबत पुराव्यानिशी गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एस.रमेश कुमार यांना रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आणि दोषींवर तातडीची कारवाई करण्याबाबत कळविण्यात आले. त्यानुसार,१ डिसेंबर २०२५ रोजी सात दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.पण, आदर्श आचार संहितेचा भंग होऊ नये,याकरीता आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.तत्पूर्वी एस.रमेश कुमार यांनी ५ डिसेंबर २०२५ रोजी उपवनसंरक्षक(प्रा.)वडसा वनविभाग वडसा यांना पत्रकाद्वारे प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने दिनांक ०७.१२.२०२५ रोजी पूर्वी सखोल चौकशी करून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करून अहवाल परस्पर आपले स्तरावरून निवेदनकर्ते यांना पाठवून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यापासून परावृत्त करावे व तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा,असे आदेश दिले.मात्र,मुख्य वनसंरक्षकांनी दिलेल्या पत्रकावर
अजून पावेतो कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याने मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येत आहे.विशेष म्हणजे,जेव्हा एखादा वरिष्ठ अधिकारी आपल्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याला स्वतःच्या सहीनिशी पत्रक काढून आदेश देतो आणि त्यावर सखोल चौकशी करून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यास सांगतो,मात्र त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसेल,तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्राची काही किंमतच उरलेली नाही,असेच म्हणावे लागेल.यासाठी न्यायालयीन दार ठोठावण्याची वेळ येऊ नये,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
  • एस.रमेश कुमार,मुख्य वनसंरक्षक(प्रा.), गडचिरोली👇
पुराडा वनपरिक्षेत्रातील सागवान वृक्षतोडीबाबत वडसा डीएफओ कार्यालयास रीमांडर दिलेला आहे. तुम्ही डीएफओ कार्यालयातून माहिती घ्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!