Sunday, July 19, 2026
Homeगडचिरोलीरब्बी हंगाम पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन..

रब्बी हंगाम पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्यात शेती उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रयोगांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागातर्फे दरवर्षी राज्यांतर्गत पीक स्पर्धा आयोजित करण्यात येते.त्याच अनुषंगाने रब्बी हंगाम २०२५-२६ साठी अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची राज्यांतर्गत पीक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.या स्पर्धेमुळे प्रयोगशील शेतकऱ्यांचे मनोबल वाढून अद्ययावत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होईल,तसेच त्यांच्या यशस्वी अनुभवांचा लाभ परिसरातील इतर शेतकऱ्यांना मिळून राज्याच्या एकूण कृषी उत्पादनात मोलाची भर पडेल,असा या योजनेचा उद्देश आहे.
या स्पर्धेच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांना तालुकास्तरावरील पीक स्पर्धेत सहभाग नोंदविता येणार असून,तालुक्यातील उत्पादकतेच्या आधारे जिल्हा व राज्यस्तरासाठी विजेत्यांची निवड केली जाणार आहे.रब्बी हंगामातील एकूण पाच पिकांसाठी ही स्पर्धा घेण्यात येणार असून,तालुका,जिल्हा व राज्य अशा तीन स्तरांवर स्पर्धकांची निवड होणार आहे.
स्पर्धेत समाविष्ट रब्बी पिके-ज्वारी,गहू,हरभरा,करडई व जवस (एकूण ५ पिके)
प्रवेश शुल्क- 
सर्वसाधारण गट : प्रतिपिक ३०० रुपये
आदिवासी गट : प्रतिपिक १५० रुपये
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५
बक्षिसांचे स्वरूप(सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी समान)
तालुकास्तर : प्रथम ५,००० रुपये,द्वितीय ३,००० रुपये,तृतीय २,००० रुपये
जिल्हास्तर : प्रथम १०,००० रुपये, द्वितीय ७,००० रुपये,तृतीय ५,००० रुपये
राज्यस्तर : प्रथम ५०,००० रुपये,द्वितीय ४०,००० रुपये तृतीय ३०,००० रुपये
शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवून त्यांच्या कष्टातून पिकवलेल्या उच्चांकी उत्पादनाला योग्य सन्मान देण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची असल्याचे नमूद करत, रब्बी हंगाम २०२५-२६ साठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या राज्यांतर्गत पीक स्पर्धेत सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,असेही त्यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलिसांनी पकडले सुगंधीत तंबाखूचे मोठे १० पोते..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-सध्याच्या घडीला राज्याच्या विविध भागात अवैध सुगंधित तंबाखू,गुटखा व इतर मादक पदार्थ विक्री तथा त्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू असतांनाच...

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ; प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता यांच्या समान निधी(Matching Schemes)व असमान निधी(Non-Matching Schemes)योजनांद्वारे राज्यातील शासनमान्य...

रेल्वेची धडक; सहा हरणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या पारशीवनी तालुक्यातील कन्हान नगर परिषद हद्दीच्या तुकाराम नगर नजीकच्या रेल्वे स्टेशन परिसरातील ट्रॅकवर तब्बल सहा हरीण मृतावस्थेत आढळून आल्याची घटना आज,शनिवार...

नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद शाळेत दोन डिजिटल वर्गखोल्यांचे उद्घाटन; प्रत्यक्ष मतदानातून शालेय मंत्रिमंडळाची स्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नैनपूर वार्ड येथील महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत डिजिटल शिक्षण आणि लोकशाही मूल्यांचा सुंदर संगम अनुभवत आज,शनिवार १८...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!