- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्यात एसआयटी(विशेष तपास पथक)पथकाने आज, मंगळवार २३ डिसेंबर रोजी नागपूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी रवींद्र शंकरराव काटोलकर यांना अटक केली असून त्यांच्यावर १२ कोटी रुपयांहून अधिक रकमेची शासकीय फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे.एसआयटीने आतापर्यंत तब्बल २६ जणांना अटक केली असून यामध्ये शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी,लिपिक,मुख्याध्यापक, शाळेचे संचालक आणि शिक्षकांचा समावेश आहे.रवींद्र काटोलकर यांना अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने त्यांना २५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.जेणेकरून घोटाळ्यातील आणखी काही सूत्रधार गळाला लागण्याची शक्यता आहे.
रवींद्र काटोलकर हे २०२१ ते २०२२ या काळात नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत होते. त्यावेळेस त्यांनी बनावट विद्यार्थी ओळखपत्रे आणि बोगस शिक्षकांच्या माहितीबाबत कल्पना असतांनाही, कोणत्याही प्रकारची चौकशी न करता वेतनाचे प्रस्ताव मंजूर केले.स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी पदाचा गैरवापर करत शासनाची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केलेल्या तक्रारीनंतर सर्वांचे पितळ उघडे पडले आहे.
- Advertisement -

