Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरअवैधरित्या रेतीची चोरी; ट्रॅक्टरसह ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..

अवैधरित्या रेतीची चोरी; ट्रॅक्टरसह ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-काही कालावधीपासून बंद स्वरूपात असलेल्या अवैध गौण खनिजांच्या चोरीचे सत्र आता जोर धरू लागले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात अवैध रेती तस्करी डोकेवर काढू लागली आहे.अश्याच प्रकारे अवैधरित्या रेती चोरी करून तिची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध चिमूर पोलिसांनी धडक कारवाई करत ट्रॅक्टरसह ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे नेरी ते चिमूर मुख्य मार्गावर शिवमंदिरासमोर संयुक्तरित्या नाकेबंदी केली असता, ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३४ एल ७८६९ च्या ट्रॉलीमध्ये एक ब्रास अवैध रेती भरून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. प्रकरणी प्रमोद संतोष धारने,रूपेश कोंडू शेंडे वय ३० वर्षे,दोघेही रा.गोंदेडा, ता.चिमूर,जि.चंद्रपूर असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.प्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रॉलीतील अंदाजे ५ हजार रुपये किमतीची रेती तसेच सुमारे ६ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर असा एकूण ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे,उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे व पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन साठे,रोहित तुमसरे,सचिन खामनकर,सोनू,रूपेश,फाल्गुन परचाके आदींनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!