- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुनिश्र्वर बोरकर
गडचिरोली :-जिल्हा खनिकर्म कार्यालय परिसरात काही कामानिमित्त गेलेल्या एका आदिवासी बांधवाला बेकायदेशीरपणे नजरकैदेत ठेवून अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी परिवर्तन पॅनलचे मुख्य संयोजक तथा आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांचे सह चार जणांवर तसेच सात ते आठ जणांवर लायजनिंग ऑफीसर धनेश मोतीराम जुमनाके वय ५० वर्षे,रा.लाझेंडा वॉर्ड क्र.०५,धानोरा रोड, गडचिरोली यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून गडचिरोली पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोशन कोटरंगे,वय २८ वर्षे, रा.कोनसरी,ता.चामोर्शी,जि.गडचिरोली,सुनंदा जेंगठे,वय ४९ वर्षे,रा.कोनसरी,ता.चामोर्शी,जि.गडचिरोली,विवेक खोब्रागडे ऊर्फ विक्की, वय ३५ वर्षे,रा.गडचिरोली,राज बन्सोड,वय ४० वर्षे, रा.गडचिरोली तसेच त्यांचेसोबत इतर सात ते आठ अनोळखी इसम अशी आरोपींची नावे असून त्यांचेवर अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती अत्याचार याचार प्रतिबंधक अधिनियम,१९८९ अंतर्गत कलम ३(२)(व्ही ए),३(१)(आर),३(१)(व्ही), भारतीय न्याय संहिता(बी एन एस),२०२३ अंतर्गत कलम २९६, १९०,१८९(२),१२७(२),११५(२)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की,धनेश जुमनाके हे मे.त्रिवेणी अर्थमुव्हर्स अँड इंफ्रास्टक्चर प्रा.लि.मध्ये सन २०२१ पासुन ज्यु.लायजंनिग ऑफीसर या पदावर कार्यरत असून १७ डिसेंबर २०२५ रोजी ते दुपारी दीड वाजेच्या सुमारास जिल्हा खनिकर्म कार्यालय गडचिरोली परिसर येथे रॉयल्टी चालान भरण्याच्या अधिकृत कामासाठी उपस्थित होते.त्यावेळी तेथे उपस्थित असलेले रोशन कोटरंगे,सुनंदा जेंगठे,विवेक खोब्रागडे, राज बन्सोड व त्यांचेसोबत इतर ७-८ अनोळखी इसम यांनी अचानकपणे धनेश यांना घेरून “तु जुमनाके आहेस का?” होकार देताच हात पकडुन,जबरदस्तीने अडवुन ठेवले,हालचाल रोखली व बेकायदेशीरपणे नजरकैदेत ठेवले.विरोध केला असता शरीर दाबुन ठेवले व अश्लील अपमानास्पद शीवीगाळ करुन सार्वजनिक ठिकाणी अपमान केला.त्याचबरोबर, “तुला भर चौकात नग्न करुन मारहाण करु,पत्नी बद्दल अपशब्द वापरले.घराला घेराव/मोर्चा घालुन कुटुंबाला इजा करु,कोनसरी येथील जमीन संपादनाविरोधात व्हिडीओ जबाब दे अन्यथा गंभीर परिणाम होतील” तसेच उपस्थितांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप धनेश जुमनाके यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे.तसेच सार्वजनिक ठिकाणी जबरदस्तीने व्हिडीओ काढला व कागदी जबाब जबरदस्तीने द्यायला भाग पाडले,तो व्हिडीओ त्यांनी सोशीयल मिडीयावर प्रसारीत केला आहे,त्यामुळे माझ्या प्रतिष्ठेला व सुरक्षीततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.यामुळे मला तिव्र मानसीक त्रास झाला असुन आता माझी जगण्याची इच्छा राहीलेली नाही,मला आत्महत्या करण्याचा विचार येत आहे.माझे कुटुंब सुध्दा भीतीच्या वातावरणात राहत असुन घराबाहेर पडण्याची हिमंत करीत नाही,भविष्यात मला किंवा माझ्या कुटुंबास काहीही व कुठलीही जिवीत हानी अथवा नुकसान झाल्यास रोशन कोटरंगे,सुनंदा जेंगठे,विवेक खोब्रागडे ऊर्फ विक्की,राज बन्सोड तसेच त्यांचेसोबत असलेले इतर ७ ते ८ अनोळखी इसम हे सर्व जबाबदार राहतील. असेही धनेश जुमनाके यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तोंडी तक्रारीत नमूद केले आहे.राज बन्सोड व इतर आरोपी फरार असुन गडचिरोली पोलीसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.सदर घटनेचा आदिवासी बांधवानी निषेध केला असुन आदिवासी बांधवांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदन दिले आहे.
- Advertisement -

