Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली,देसाईगंज व आरमोरी नगरपरिषदेची 'या' ठिकाणी होणार मतमोजणी.. - सकाळी दहा...

गडचिरोली,देसाईगंज व आरमोरी नगरपरिषदेची ‘या’ ठिकाणी होणार मतमोजणी.. – सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील गडचिरोली,देसाईगंज व आरमोरी या तीन नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर व आज,शनिवार २० डिसेंबर रोजी काही प्रभागांची मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानुसार,आता उद्या,रविवार २१ डिसेंबरला जिल्ह्यातील तिन्ही नगरपरिषदेतील मतमोजणीला सकाळी १० वाजेपासून सुरुवात होणार असून मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
गडचिरोली नगरपरिषदेची मतमोजणी कृषी महाविद्यालय,सोनापूर येथे होणार असून येथे प्रत्यक्ष मतमोजणीसाठी ७ व पोस्टल बॅलेटसाठी १ असे एकूण ८ टेबल असतील.देसाईगंज नगरपरिषदेची मतमोजणी देसाईगंज नगरपरिषद सांस्कृतिक सभागृहात पार पडणार असून येथे प्रत्यक्ष मतमोजणीसाठी १० व पोस्टल बॅलेटसाठी १ असे एकूण ११ टेबल निश्चित करण्यात आले आहेत.आरमोरी नगरपरिषदेची मतमोजणी तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय येथे होणार असून येथे प्रत्यक्ष मतमोजणीसाठी ३ व पोस्टल बॅलेटसाठी १ असे एकूण ४ टेबल ठेवण्यात आले आहेत.
या निवडणुकीत तीनही नगरपरिषदांमधून नगराध्यक्ष पदासाठी एकूण २३ तर नगरसेवक पदासाठी ३३९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.गडचिरोली नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी ७ तर नगरसेवक पदासाठी १३१ उमेदवार,देसाईगंज नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी ६ व नगरसेवक पदासाठी १०० उमेदवार,तर आरमोरी नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी १० व नगरसेवक पदासाठी १०८ उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे.मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व सुरळीतपणे पार पडावी यासाठी सर्व तांत्रिक,प्रशासकीय व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!