Saturday, July 11, 2026
Homeआरमोरीआरमोरी तालुक्यात दहशत माजविणारा बिबट्या वाघ जेरबंद.. - दोन महिलांचा घेतला होता...

आरमोरी तालुक्यात दहशत माजविणारा बिबट्या वाघ जेरबंद.. – दोन महिलांचा घेतला होता जीव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-गेल्या दोन महिन्यांपासून आरमोरी तालुक्याच्या देऊळगाव व इंजेवारी परिसरात दहशत माजविणाऱ्या बिबट्या वाघास पकडण्यात आज,गुरुवार ११ डिसेंबर रोजी वन विभागास यश आले असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. बिबट्याने मागील महिन्याच्या १९ नोव्हेंबरला देऊळगाव येथील महिलेस ठार केले होते,तर नुकतेच मंगळवार २ डिसेंबरला दुपारच्या सुमारास आरमोरी तालुक्याच्या इंजेवारी येथील महिलेचा जीव घेतला होता.अवघ्या १४ दिवसाच्या अंतरावर दुसरी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांनी तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी याबाबत आंदोलन करून नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.त्यानुसार,वडसा वन विभागाच्या वतीने नरभक्षक बिबट्यावर पाळत ठेवून त्याला जेरबंद करण्यासाठी जंगल परिसर तसेच शेतशिवारात तब्बल २५ ट्रॅप कॅमेरे,५ सीसीटीव्ही लाईव्ह कॅमेरे व दोन अत्याधुनिक ड्रोन कॅमेरेऱ्यांचा उपयोग करण्यात आला.त्याचबरोबर,बिबट्यासाठी पिंजरा आणि शिकार ठेवण्यात आली.लागलीच बिबट्या शिकारीसाठी पिंजऱ्यात जाणार तोच अलगद जेरबंद झाला.आज सकाळच्या सुमारास बिबट्याला बेशुद्ध करून नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालय व वन्यप्राणी बचाव केंद्रात रवाना करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!