Tuesday, October 27, 2026
Homeचंद्रपूरक्रिकेटचा शहेनशहा सचिन तेंडुलकर वाघ पाहण्यासाठी ताडोबात..

क्रिकेटचा शहेनशहा सचिन तेंडुलकर वाघ पाहण्यासाठी ताडोबात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अनेकांना भुरळ घालतो आहे.यात एकदा आलेल्या व्यक्तीला अनेकदा येण्याची इच्छा असते. अश्याच प्रकारे क्रिकेटचा शहेनशहा सचिन तेंडुलकर हे आतापर्यंत तब्बल सहावेळा विदर्भात येऊन व्याघ्रदर्शनाच्या मोहात पडले आहेत.अश्यातच परत आता सातव्यांदा ताडोबाच्या व्याघ्र दर्शनासाठी चिमूर तालुक्यात दाखल झाले आहेत.काल शुक्रवारी त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर आणि मित्रपरिवार व्याघ्र दर्शनासाठी सज्ज झाले आहेत.सचिन तेंडुलकर
यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील उमरेड-पैरोली-करंडला  अभयारण्यात त्यांना वाघाचे दर्शन लाभले होते.देश-विदेशातील हजारो पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने प्रसिद्ध क्रिकेटपटू ब्रायन लारा, अनिल कुंबळे व अनेक नामांकित सिने अभिनेता- अभिनेत्त्यांना भुरळ घातली आहे.सचिन तेंडुलकर तर ताडोबाच्या प्रेमात असून ते दोन दिवस ताडोबात मुक्कामी राहणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चित्तथरारक घटना..! दोन वाघांची दुचाकीवर झडप; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यातून एक चित्तथरारक घटना समोर आली आहे.रात्रीच्या अंधारात जंगलमार्गे दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवर दोन वाघांनी झडप घालून तरुणाला ठार केल्याची घटना...

उद्याला गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने  उद्या,बुधवार २८ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तर चंद्रपूर, गोंदिया,नागपूर,वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये...

२७ वर्षीय तरुणाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा; आज सकाळची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नगर परिषद हद्दीत येणाऱ्या नैनपूर येथील एका २७ वर्षीय तरुणाने घरी कुणीही नसतांना स्वतःच्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना...

नागपूर पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? राजकीय वर्तुळात उत्सुकता..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज,मंगळवार २७ ऑक्टोंबरला जाहीर होणार असून अभिजीत वंजारी वर्सेस सुधाकर कोहळे यांच्यापैकी कोण बाजी मारणार,याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!