भंडारा :-दुकान बंद करून घरी परतणाऱ्या टेलर व्यवसायिकाची दुचाकी,चपला,मोबाइल व दुकानाच्या चाव्या चक्क नदी पुलावर आढळून आल्याने कुटुंबियांना मोठा हादरा बसला आहे.दिलीप दुधराम हटवार वय ४५ वर्षे,रा.परसोडी, ता.जि.भंडारा असे टेलरींग व्यवसाय करणाऱ्या बेपत्ता व्यक्तीचे नाव आहे.प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली; मात्र अद्याप व्यवसायिकाचा शोध लागलेला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त झाले आहेत.सदरची घटना शुक्रवार ३१ ऑक्टोंबर रोजी घडली आणि काल शनिवारी कोरंभी येथील वैनगंगा नदी पुलावर साहित्य आढळून आल्याने व्यवसायिकाने वैनगंगा नदीत उडी घेतल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.प्रकरणी जवाहनगर पोलिसांकडून त्या दिशेने तपास सुरू आहे.दिलीप हटवार हे टेलर असून त्यांचा शहापूर येथे टेलरींगचा दुकान आहे.तर त्यांची पत्नी लक्ष्मी एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.नेहमीप्रमाणे दिलीप हटवार हे शुक्रवारी दुकानात गेले होते.रात्र होऊनही ते घरी परतले नसल्याने त्यांच्या पत्नीने फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पत्नीने सर्वत्र शोधाशोध केली,पण दिलीप यांचा कुठेही थांगपत्ता लागलेला नाही.अश्यातच दुकान नजिक असलेले पानटपरी चालक पुरुषोत्तम भीडे यांनी दिलीप हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घरी जातो,असे सांगून निघाले असल्याचे माहिती दिली. दरम्यान,काल शनिवारी दिलीप यांची दुचाकी,चपला, मोबाइल व दुकानाच्या चाव्या कोरंभी येथील वैनगंगा नदी पुलावर आढळून आल्याने चर्चांना पेव फुटले आहे. दिलीप हटवार यांनी नदीत उडी घेतली की कुठे निघून गेलेत,याचा शोध जवाहनगर पोलिसांकडून सुरू आहे.
घरी परतणाऱ्या व्यवसायिकाचे साहित्य आढळले नदी पुलावर..!
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

