Saturday, May 2, 2026
Homeनागपूरअगोदरच १५० कोटी रुपयांचे बिले थकीत; तेच मिळत नाही आणि आणखी कोट्यवधी...

अगोदरच १५० कोटी रुपयांचे बिले थकीत; तेच मिळत नाही आणि आणखी कोट्यवधी रुपयांच्या दुसऱ्या निविदा.. – कामे होणार कशी?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्याच्या विविध जिल्ह्यातील कंत्राटदारांनी कामे पूर्ण केल्यानंतरही थकित बिले काढली जात नसल्याची सर्वत्र ओरड सुरू असतांनाच येत्या ८ डिसेंबर २०२५ रोजी उपराजधानीत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास ९३.९४ कोटींच्या निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केल्या आहेत.पण,अगोदरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ठेकेदारांचे तब्बल १५० कोटी रुपयांचे देयक प्रलंबित आहेत.गेल्या वर्षभरापासून ठेकेदार ही थकबाकी मिळवण्यासाठी आंदोलने करीत आहेत.परंतु,त्यांना केवळ आश्वासनेच दिली जात असल्याने नागपुरातील ठेकेदारांनी एकजूट दाखवत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.यामुळे रविभवन,आमदार निवास,हैदराबाद हाऊस आणि देवगिरी येथील सुरू असलेली कामे थांबवण्यात आली असून आंदोलनाचा थेट परिणाम हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर होणार आहे.त्यातच,प्रत्यक्षात देयकांचा भरणा होईपर्यंत आंदोलन थांबवणार नसल्याचे ठेकेदारांनी स्पष्ट केल्याने सर्व कामे ठप्प झाली आहेत.
एकीकडे ठेकेदारांचे आंदोलन तर दुसरीकडे अधिवेशनाचे एक तरी सत्र नागपुरात घेणे नागपूर करारानुसार बंधनकारक आहे.हिवाळी अधिवेशन नागपुरात झाले नाही तर नागपूर कराराचा भंग होण्याची शक्यता आहे. अश्यातच सरकार हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेऊ शकतो.कारण येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि निवडणुकांचे कारण यासाठी पुरेसे आहे.ठेकेदारांची देयके मिळाली तर अधिवेशन नागपुरात अन्यथा नागपूर की मुंबई?असा पेच सध्या सरकारपुढे निर्माण झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!