- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुरमाडी (सावरी)येथे विजेचा शॉक लागून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.इंदिरा घनश्याम बडवाईक असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.
इंदिरा बडवाईक या आज सकाळच्या सुमारास शेतावर गेल्या होत्या.शेतातील कामे आटोपून सायंकाळच्या सुमारास घरी परतल्या होत्या.घरात असलेल्या लोखंडी रॉडला विजेचा प्रवाह आला होता.अश्यातच त्याच लोखंडी रॉडला न कळत इंदिरा बडवाईक यांचा स्पर्श झाला.स्पर्श होताच त्यांना विजेचा जोरदार शॉक लागला. उपस्थित एकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही जोरदार शॉक लागला.लागलीच गावातील नागरिकांनी इंदिरा यांना लाखनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.
- Advertisement -

