Monday, September 21, 2026
Homeनागपूरदोन स्कूल व्हॅनमध्ये धडक; आठ विद्यार्थी जखमी..!

दोन स्कूल व्हॅनमध्ये धडक; आठ विद्यार्थी जखमी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-मानकापूर चौकाच्या स्टेडियम मार्गावर स्कुल व्हॅन व स्कुल बसमध्ये जोरदार धडक होऊन स्कूल व्हॅनमधील आठ विद्यार्थी जखमी झाले,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.अपघातात भवन्स कोराडी विद्यालय व नारायणा विद्यालयाच्या स्कुल बसमध्ये जोरदार धडक बसली. मार्गाच्या एकाच लेनवर दुतर्फा वाहतूक सुरू असल्याने सदरचा अपघात घडला.अपघात घडताच रस्त्यावरून जाणाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मुलांना अपघातग्रस्त व्हॅनमधून बाहेर काढले.जखमी मुलांना वाचवित असतांना दोन मुले शुद्धीवर  होती,तर काही मुले गाडीत बेशुद्ध पडली होती. त्यातील एका मुलाला फक्त मोठा आवाज ऐकू आला आणि नंतर काय घडले ते कळलेच नाही.काही पालकही काही मिनिटांतच घटनास्थळी पोहोचले.अपघातादरम्यान वाहनाचे स्टिअरिंग व्हीलवर आदळल्याने व्हॅन चालकाच्या डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली.जखमींना उपचारासाठी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि जवळच्या रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.मात्र,घडलेल्या अपघातात जीवितहानी टळली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!