- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका दुचाकीवरील पोलीस कर्मचाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर दुसऱ्या दुचाकीवरील एकाच कुटुंबातील चार जणांपैकी दोघेजण जखमी झाल्याची घटना काल, रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास भंडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुजबी (बेला)गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली.५५ वर्षीय भारत तुकाराम रामटेके रा.बेला,ता.जि.भंडारा असे अपघातात मृत पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते गोंदिया जिल्हा पोलीस मुख्यालयात पोलिस कॉन्सटेबल पदावर कार्यरत होते.तर दुसऱ्या दुचाकीवरील आदर्श रंजीत कोल्हटकर वय ३६ वर्षे व पत्नी किरण आदर्श कोल्हटकर वय ३० वर्षे,रा.खरबी (नाका),ता.जि.भंडारा दोघेही पती-पत्नी जखमी झाले.यात पोलीस कर्मचाऱ्याच्या पाठीमागे बसलेला सहकारी तसेच दुसऱ्या दुचाकीवरील दोन चिमुकल्या थोडक्यात बचावल्या व किरकोळ जखमी झाल्या.

भंडारावरून एमएच ३६-एस ७९९९ क्रमांकाच्या दुचाकीने आदर्श कोल्हटकर,पत्नी किरण कोल्हटकर, ७ वर्षीय मुलगी अधिरा व ९ महिन्याची चिमुकली हे चौघेही आपल्या स्वगावी खरबी(नाका)येथे जात होते.तर दुचाकी क्रमांक-एमएच-३६- क्यू-३९१५ ने बेला येथील सुभाष वार्ड रहिवासी व पोलीस कर्मचारी भारत रामटेके हे मुजबी(बेला)गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर येताच दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक बसली.धडक इतकी जोरदार होती की,यात पोलीस कर्मचारी रामटेके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनेची माहिती पोलीस प्रशासनास मिळताच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद जनबंधू करीत आहे.भारत रामटेके यांच्या पार्थिवावर आज,सोमवार ८ सप्टेंबर रोजी बेला येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा आणि एक मुलगी असा आप्त परिवार आहे.
- Advertisement -

